महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कायद्यापेक्षा कोणताही व्यक्ती मोठा नाही, नारायण राणेंच्या अटक प्रक्रियेवर विजय वड्डेटीवार यांची प्रतिक्रिया - Union Minister Narayan Rane

राजकिय पक्षाच्या नेत्याने जबाबदार पदावर आल्यानंतर अशी वक्तव्ये करू नयेत. पण दुर्देवाने ज्यांना संस्कार आणि संस्कृतीचा विसर पडतो. त्यामुळे त्यांच्याकडून असे शब्द बाहेर पडतात. अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्या संदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी दिली आहे. ते नांदेड येथे पत्रकारांशी बोलत होते.

दत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार

By

Published : Aug 24, 2021, 3:29 PM IST

नांदेड - कुठल्याही राजकिय पक्षाच्या नेत्याने जबाबदार पदावर आल्यानंतर अशी वक्तव्ये करू नयेत. पण दुर्देवाने ज्यांना संस्कार आणि संस्कृतीचा विसर पडतो. त्यामुळे त्यांच्याकडून असे शब्द बाहेर पडतात. अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्या संदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी दिली आहे. ते नांदेड येथे पत्रकारांशी बोलत होते.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार पत्रकारांशी बोलताना
'कायद्यापेक्षा व्यक्ती मोठा नाही'

राज्याच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्ती संदर्भात वक्तव्य करताना त्या शब्दाला विचारांची धार असली पाहिजे. ती झुंडशाहीची, धमकीची दिसल्यानंतर याला कधीही धार नसते. या घटनेचा व वक्तव्याचा निषेध करतो. व्यक्ती मोठा नाही तर, कायदा मोठा आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायद्यानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कार्यवाही व्हावी, असही यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा -नारायण राणेंना भाजपचा पूर्ण पाठिंबा - देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details