नांदेड - शहरातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात बायोकेमिकलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने कोरोना स्वॅब तपासणी लॅब चालवली आहे. नॉन मेडिकल स्वॅब तपासणी करणारी ही महाराष्ट्र राज्यातील पहिलीच लॅब आहे.
माहिती देताना विद्यार्थिनी आणि कुलगुरू भारतातील सगळ्या विद्यापीठांनी जर आमच्या प्रमाणे पुढाकार घेऊन असे काम केले असते, तर कदाचित मृत्यूचा दर नक्कीच कमी झाला असता, असे मत लॅबचे संचालक डॉ. गाजनन झोरे यांनी व्यक्त केले आहे.
सुरुवातीच्या काळात शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात देखील सुविधा उपलब्ध नव्हती. मात्र, आमच्या शिक्षणाचा फायदा समाजाला व्हावा म्हणून आम्ही लॅब चालवण्याचा निर्णय घेतल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
तसेच, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले सरांनी आम्हाला लागेल ती मदत केली. कालांतराने कामाची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी देखील ६ विद्यार्थ्यांना वेतन द्यायला सुरुवात केली. या कामाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.
हेही वाचा-सरकारचे नेमके चाललंय काय? ते लोकांनाही कळू द्या- खा. संभाजीराजे