नांदेड- बारावीचा पेपर देवून दुचाकीने घराकडे जात असताना ऑटोच्या धडकेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात अर्धापूर तालुक्यातील कामठा-नांदेड रस्त्यावर घडला असून या अपघातात आणखीन एक विद्यार्थी जखमी झाला आहे. चक्रधर रामदास कदम (वय १८) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
बारावीचा पेपर देवून परतणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू - chakradhar kadam accident
कामठ्याला १२ वीची परीक्षा देवून चक्रधर कदम हा त्याच्या मित्रांसह नांदेडला परतत होता. मात्र, वाटेत नांदेडकडून कामठ्याकडे जाणाऱ्या मॅजिक ऑटो (एम.एच.२६ बी.सी. २१८९) ने चक्रधरच्या दुचाकीला धडक दिली.
कामठ्याला १२ वीची परीक्षा देवून चक्रधर कदम हा त्याच्या मित्रांसह नांदेडला परतत होता. मात्र, वाटेत नांदेडकडून कामठ्याकडे जाणाऱ्या मॅजिक ऑटो (एम.एच.२६ बी.सी. २१८९) ने चक्रधरच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात चक्रधर व त्याचा मित्र गंभीर जखमी झाला होता. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी चक्रधरला मृत घोषित केले. चक्रधरवर कोंढा येथे सोमवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्यार्थी चक्रधरच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या अपघातातील दुसऱ्या विद्यार्थ्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, स.पो.उप.नि विद्यासागर वैद्य, जमादार परमेश्वर कदम, संजय कळके पाटील यांनी दिली.
हेही वाचा-महिन्यात 60 कोटी थकबाकी वसुलीचे पालिकेसमोर उद्दिष्ट! जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पुढाकार