महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! नांदेडमध्ये ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

ऑनलाइन शिक्षण मिळत नसल्याने नांदेडमधील मजुराच्या 17 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी घरच्यांकडे मोबाइलची मागणी करूनही मोबाइल न मिळल्याने अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले आहे. तिने 16 जून रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

बुद्धशी पोटफोडे
बुद्धशी पोटफोडे

By

Published : Jun 19, 2021, 7:17 AM IST

नांदेड- ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नसल्या कारणाने एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक नांदेडात घडली आहे. कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत, तर ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र मोबाईल मिळत नसल्याने नायगाव येथील सतरा वर्षीय बुद्धशी पोटफोडे या विध्यार्थीनीने गळफास घेत टोकाचे पाऊल उचलले आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा फटका-

कोरोनाच्या संकटकाळात देशातील शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय अवलंबला आहे. मात्र, आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या पाल्यांना मोबाईल घेणे परवडत नाहीये. यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. यामुळे श्रीमंत आणि गरीब विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची दरी पडत असल्याचे चित्र आहे.

मोबाईल नसल्याने आत्महत्या-

ऑनलाइन शिक्षण मिळत नसल्याने नांदेडमधील मजुराच्या 17 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी घरच्यांकडे मोबाइलची मागणी करूनही मोबाइल न मिळल्याने अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले आहे. तिने 16 जून रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

बुद्धशी प्रकाश पोटफोडे ही नायगाव शहरातील फुलेनगर येथे राहत होती आहे. बुद्धशी यावर्षी अकरावीत शिकत होती. तिला दहावीला 75 टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेतही चांगले गुण मिळवण्यासाठी तिची धडपड सुरू होती. त्यामुळे तिनं आपल्या आई-वडिलांकडे मोबाईलची मागणी केली होती. घरच्यांनीही लवकरत मोबाईल घेऊन देण्याचं आश्वासन दिलं होतं. तोपर्यंत बुद्धशीने गळफास लावून आपले जीवन संपवले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details