नांदेड - शहरासह जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनान रविवारी (१२ जुलै)ला मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीला पाचव्या दिवशीही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
नांदेडमध्ये कडक संचारबंदी, पाचव्या दिवशीही शहरात शुकशुकाट
शहरातील सर्व बाजार, दुकाने व इतर आस्थापना सुरू राहू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने पेट्रोलिंगही करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता संचारबंदीला नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. संचारबंदीमुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.
कोरोना महामारीचा संसर्ग वाढू नये यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. जून महिन्यापासून टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. लॉकडाऊनच्या काळात बहुतांश नागरिकांनी घरातच राहणे पसंद केले. मात्र, अनलॉक प्रक्रियेत शिथिलता देण्यात आल्याने पुन्हा नागरिकांची बाजारपेठेत गर्दी दिसून आली. नागरिकांकडून लॉकडाऊनच्या नियमांचे पालन होत नसल्याने पुन्हा एकदा १२ ते २० जुलैपर्यंत संचारबंदीचे आदेश देण्यात आले. संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजय मगर स्वतः रस्त्यावर उतरले. संचारबंदीच्या काळात अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येत असल्याने रिकामटेकड्यांचे घराबाहेर फिरणे कमी झाले दिसून येत आहे.
शहरातील सर्वबाजार, दुकाने व इतर आस्थापना सुरू राहू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने पेट्रोलिंगही करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता संचारबंदीला नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. संचारबंदीमुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.