नांदेड : अवैध वाळू उपसा करण्यासाठी जे तराफे बनविले जात आहे. ते तराफे हे थर्माकॉलपासून बनविले जात आहे. त्यामुळे महसूल, मनपा व पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करून थर्माकॉलचा साठा जप्त करण्यात आला, असून संबंधित दुकानादारास दंड ठोठावण्यात आला आहे.
नांदेडमध्ये थर्माकॉलचा साठा प्रशासनाकडून जप्त; दंडही ठोठावला - stocks of thermocol seized in nanded
अवैध वाळू उपसा करण्यासाठी जे तराफे बनविले जात आहे. ते तराफे हे थर्माकोलपासून बनविले जात आहे. त्यामुळे महसूल, मनपा व पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करून थर्माकॉलचा साठा जप्त करण्यात आला, असून संबंधित दुकानादारास दंड ठोठावण्यात आला आहे.
![नांदेडमध्ये थर्माकॉलचा साठा प्रशासनाकडून जप्त; दंडही ठोठावला नांदेडमध्ये थर्माकॉलचा साठा प्रशासनाकडून जप्त; दंडही ठोठावला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-07:15:25:1593697525-mh-ned-02-tharmacolchasathajapt-foto-7204231-02072020182008-0207f-1593694208-327.jpg)
राज्य शासनाने यापूर्वीच थर्माकोल विक्रीवर बंदी असताना नांदेड शहरातील काही व्यापारी मंडळी अवैधपणे थर्माकोलची विक्री करत असल्याच्या कारणांवरुन छापा मारला होता. तर, आता इतवारा भागातील सराफा व नगरेश्वर मंदिरातील कपडा कपडा मार्केटमध्ये म युनूस म इस्माईल, एका जुन्या घरात तसेच इतवारा पोलीस ठाणे जवळील मनपा मार्केटमधील मॉडर्न ट्रेडर्स या प्रतिष्ठानावर या पथकांनी छापा टाकला आहे.
या कारवाईत दोन प्रतिष्ठाने सील करण्यात आली. तसेच, एका प्रतिष्ठानास 5 हजार दंड लावून त्यातील माल जप्त करण्यात आला. ही कारवाई मनपाचे सह. आयुक्त गुलाम सादेख, डॉ. रईसोद्यिन, महसूल विभागाचे नायब तहसिलदार मोगाजी काकडे व पोलिस उपनिरिक्षक काळे व इतर कर्मचारी व पोलिस यांच्या पथकाने केली.