महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना तपासणी केंद्रांची मान्यता; नांदेडसह बीड, बारामतीचा समावेश - corona in nanded

कोविड-19 चा वाढता प्रसार लक्षात घेता स्थानिक पातळीवर चाचणी होण्याच्या दृष्टीने राज्यातील शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तपासणी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घेतला आहे. यामध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा समावेश आहे.

corona testing centers in maharashtra
सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना तपासणी केंद्रांची मान्यता; नांदेडसह बीड, बारामतीचा समावेश

By

Published : Apr 18, 2020, 8:19 PM IST

नांदेड - कोविड-19 चा वाढता प्रसार लक्षात घेता स्थानिक पातळीवर चाचणी होण्याच्या दृष्टीने राज्यातील शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तपासणी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घेतला आहे. यामध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा समावेश आहे. याचसोबत अभिमत विद्यापीठांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांचा देखील समावेश आहे. त्यानुसार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांचे प्रस्ताव तातडीने पाठवण्याचे सुचीत करण्यात आले होते. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात या प्रकारची तपासणी केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. याअंंतर्गत राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-19 चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

संबंधित चाचणी केंद्रांसाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री तसेच अन्य साधन सामग्रीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्ठापन करण्यात आली आहे. या समितीच्या शिफारशीनुसार पुढील पाऊले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मान्यता देण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई (जि.बीड); शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव; राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती (जि.पुणे) या महाविद्यालयांचा समावेश आहे.

या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-19 तपासणी केंद्र स्थापित करण्याच्या दृष्टीने विहित करण्यात आलेली मानके, कार्यपद्धती आणि अन्य बाबींची पूर्तता करण्याची जबाबदारी महाविद्यालयाच्या प्रमुखांवर टाकण्यात आली आहे. बाधित रुग्णांची तपासणी स्थानिक स्तरावर करणे आणि अशा रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करणे शक्य होणार असल्याने या तपासणी केंद्रांची निर्मिती लवकरात लवकर करण्यात यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details