नांदेड- दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता नांदेड-औरंगाबाद-नांदेड, अशी नवीन विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे. ही नवीन विशेष गाडी दिनांक ३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान चालविण्यात येणार आहे. ही गाडी रविवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे.
नांदेड-औरंगाबाद-नांदेड नवीन विशेष रेल्वेगाडी सुरु होणार - special train
दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता नांदेड-औरंगाबाद-नांदेड, अशी नवीन विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे.
नांदेड रेल्वे स्थानक
ही गाडी नांदेड येथून सकाळी ८ वाजता सुटेल. या गाडीला पूर्णा, परभणी, मानवतरोड, सेलू, परतूर, रांजणी, जालना, बदनापूर, मुकुंदवाडी हे थांबे घेणार आहे. औरंगाबाद येथे ही गाडी दुपारी १२ : ४५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी औरंगाबाद येथून सायंकाळी ६:१० वाजता सुटेल आणि नांदेड येथे रात्री ११ वाजता पोहोचेल. या गाडीला ८ डब्बे असतील. या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.