महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सात डिसेंबरपासून धावणार 'ही' नवी उत्सव विशेष रेल्वे - nanded train news

दिनांक ७ डिसेंबर २०२० ते १ जानेवारी २०२१दरम्यान बंगळुरू-नांदेड-बंगळुरू उत्सव विशेष गाडी चालविली जाणार आहे, अशी माहिती नांदेड विभागीय कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

रेल्वे
रेल्वे

By

Published : Dec 6, 2020, 4:42 PM IST

नांदेड -दक्षिण पश्चिम रेल्वेने कळविल्यानुसार दिनांक ७ डिसेंबर २०२० ते १ जानेवारी २०२१दरम्यान बंगळुरू-नांदेड-बंगळुरू उत्सव विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे, अशी माहिती नांदेड विभागीय कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

यानुसार, १. गाडी संख्या ०६५१९ बंगळुरू ते हुजूर साहिब नांदेड उत्सव विशेष गाडी दिनांक ७ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२०दरम्यान बंगळुरू ते नांदेड रेल्वे स्थानकादरम्यान धावेल. २. गाडी संख्या ०६५२० नांदेड ते बंगळुरू उत्सव विशेष गाडी हुजूर साहिब नांदेड ते बंगळुरू रेल्वे स्थानकावरून दिनांक ९ डिसेंबर २०२० ते १ जानेवारी २०२१दरम्यान धावेल. ३. या गाडीच्या वेळा नियमित गाडी संख्या १६५९३/१६५९४ नांदेड-बंगळुरू-नांदेड गाडीच्या वेळापत्रकानुसार असतील.

ABOUT THE AUTHOR

...view details