महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाईन ब्लॉकमुळे काही रेल्वे रद्द तर काही उशिरा धावणार - line block railway cancelled nanded

जालना ते बदनापूर सेक्शनमधील दिनेगाव रेल्वे स्थानकावर दिनांक २५ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान १५ दिवस दुपारी १५.३० ते १८.३० वाजेपर्यंत रोज ३ तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

indian railway
भारतीय रेल्वे

By

Published : Jul 26, 2021, 9:14 AM IST

नांदेड - जालना ते बदनापूर सेक्शनमधील दिनेगाव रेल्वे स्थानकावर दिनांक २५ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान १५ दिवस दुपारी १५.३० ते १८.३० वाजेपर्यंत रोज ३ तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही गाड्यांवर याचा परिणाम झाला आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

  • सदरील रेल्वे पुढीलप्रमाणे –
  1. गाडी संख्या ०७६१९ नांदेड ते औरंगाबाद साप्ताहिक विशेष गाडी दिनांक ३० जुलै ते ०६ ऑगस्ट दरम्यान पूर्णतः रद्द करण्यात येत आहे.
  2. गाडी संख्या ०७०५० औरंगाबाद ते हैदराबाद विशेष गाडी दिनांक २५ जुलै ते ०९ ऑगस्ट दरम्यान औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून रोज १२५ मिनिटे उशिरा सुटेल. म्हणजेच तिची नियमित वेळ दुपारी १६.१५ वाजता सुटण्याऐवजी या कालावधीत औरंगाबाद येथून सायंकाळी १८.२० वाजता सुटेल.
  3. गाडी संख्या ०७६५३ हैदराबाद ते पूर्णा विशेष गाडी २६ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान हैदराबाद येथून ९० मिनिटे उशिरा म्हणजेच तिची नियमित वेळ सकाळी ०८.२० वाजता ऐवजी ०९.५० वाजता सुटेल.

ABOUT THE AUTHOR

...view details