नांदेड- जवान गणेश चव्हाण यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि. 20 ऑक्टोबर) सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. मेघालय राज्यात कार्यरत असलेल्या नांदेडच्या जवानाचा रविवारी मृत्यू झाला होता. त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहे, अशी माहिती कंधारचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली आहे.
जवान गणेश चव्हाण यांच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार - नांदेड जिल्हा बातमी
मेघालय राज्यात कार्यरत असलेल्या नांदेडच्या जवानाचा रविवारी मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव आज (सोमवार) रात्री हैदराबाद येथील विमानतळावर आणण्यात येणार असून उद्या (मंगळवार) नांदेड जिल्ह्यातील त्यांच्या मूळगावी होणार आहे.
गणेश चव्हाण
कंधार तालुक्यातील कुरुळा गावातील गणेश चव्हाण हा सीमा सुरक्षा दलात मेघालय राज्यातील तुरी येथे कर्तव्यावर होता. रविवारी (दि.18 ऑक्टोबर) सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मृत जवान गणेश चव्हाण यांचे पार्थिव सोमवारी (दि. 19 ऑक्टोबर) रात्री आकरा वाजता हैदराबाद विमानतळावर येणार असल्याची माहिती आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजता शासकीय इतमामात त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे.
Last Updated : Oct 19, 2020, 10:23 PM IST