नांदेड - लॉकडाऊनच्या काळात गरजूंना शेतात पिकलेला गहू वाटप केल्याने शेतकरी कुटुंबातील महिलेचे कौतुक होत आहे. लोहा तालुक्यातील सांगवी येथील शेतकरी कुटुंबातील सुषमा ठाकूर या महिलेने यावर्षी आपल्या शेतात पिकलेला १८ क्विंटल गहू परिसरातील गोरगरीब व गरजू लोकांना वाटप केला आहे.
लॉकडाऊनमध्ये शेतात पिकलेला १८ क्विंटल गहू गरजूंना वाटप
लोहा तालुक्यातील सांगवी येथील शेतकरी कुटुंबातील सुषमा ठाकूर या महिलेने यावर्षी आपल्या शेतात पिकलेला १८ क्विंटल गहू परिसरातील गोरगरीब व गरजू लोकांना वाटप केला आहे.
लॉकडाऊनमध्ये शेतात पिकलेला १८ क्विंटल गहू गरजूंना वाटप
लॉकडाऊनच्या काळात आपल्या परिसरात राहणाऱ्या कोणत्याही गरीब व गरजू लोकांचे अन्नधान्याविना हाल होऊ नये हाच विचार मनात ठेऊन सामाजिक कार्यकर्त्या सुषमा ठाकूर यांनी आपल्या शेतात पिकलेला सर्वच गहू गरजूंना वाटप केला आहे. या स्तुत्य उपक्रमामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.