महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा चढता आलेख 60 बाधितांची वाढ - नांदेड कोरोना बातमी

नांदेड जिल्ह्यात आज (रविवार) 60 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकूण बाधितांचा आकडा हा 23 हजार 149 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात सध्या 342 सक्रिय रुग्ण आहेत.

नांदेड रुग्णालय
नांदेड रुग्णालय

By

Published : Feb 21, 2021, 9:35 PM IST

नांदेड- जिल्ह्यात गत आठवड्यापासून दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. रविवारी (दि. 21 फेब्रुवारी) सायंकाळी 5 वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार 60 कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 39 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 21 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 36 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

आतापर्यंत 23 हजार बाधितांची संख्या...!

आजच्या (रविवार) 1 हजार 306 अहवालांपैकी 1 हजार 241 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता 23 हजार 149 एवढी झाली असून यातील 22 हजार 4 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण 342 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 14 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यातील 592 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.05 टक्के आहे.

जिल्ह्यात 342 सक्रिय कोरोनाग्रस्त

जिल्ह्यात 342 सक्रिय कोरोनाग्रस्त असून त्याच्यावर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी येथे 29, जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय, नांदेड येथे 38, किनवट कोविड रुग्णालयात 6, हदगाव कोविड रुग्णालयात 7, देगलूर कोविड रुग्णालयात 4, नांदेड महापालिका अंतर्गत गृहविलगीकरण 174, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणात 45, खासगी रुग्णालयात 39 जणांवर उपचार सुरू आहेत.

सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 155, जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालयात येथे 66 इतके खाटा शिल्लक आहेत.

हेही वाचा -महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कोरोना चेक पोस्ट सुरू, तपासणीनंतर कर्नाटकमध्ये प्रवेश

ABOUT THE AUTHOR

...view details