महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडात कोरोनाचा सातवा बळी; सोमवारी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह - Nanded corona news

जिल्ह्यात सोमवारी सहा नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासह जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १३३ झाली आहे.

nanded corona
नांदेड कोरोनाबाधितांच्या संख्येत सहाने वाढ

By

Published : May 26, 2020, 9:32 AM IST

नांदेड - शहरातील मिल्लतनगरातील ५५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा जिल्ह्यातील कोरोनाचा सातवा बळी आहे. तसेच नव्या पाच ठिकाणी कोरोनाचे संक्रमण झाले असून रुग्णांची एकूण संख्या झाली १३३ झाली आहे.

शहरात सोमवारी आढळलेले सर्व रुग्ण पुरुष असून नांदेडच्या इतवारा भागात दोन रुग्ण (वय २७,३२) नांदेडच्या मिल्लतनगर (वय ५५), आनंद कॉलनी, जिजामाता कॉलनी (वय ८०), ग्रामीण भागात वडसा, ता. माहूर (वय १७), दहेली तांडा, ता. किनवट (वय २९) येथील आहेत. सोमवारच्या ९६ पैकी ८४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर आणखी २८८ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत ६३ रुग्णांना डिस्चार्ज मिळालाअसून ६२ जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच सात जणांचा मृत्यू झाला असून दोन फरार आहेत.


कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
सोमवार सायंकाळी ५ वाजेपर्यंत -

• आत्तापर्यंत एकूण संशयित - 3366
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-3060
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 1549
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 237
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 66
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -2994
सोमवारी घेतलेले नमुने - 143
• एकुण नमुने तपासणी- 3397
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 133
• पैकी निगेटीव्ह - 2830
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 288
• नाकारण्यात आलेले नमुने - 14
• अनिर्णित अहवाल – 128
• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 63
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 7
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी -133733

या सर्वाच्या हातावर शिक्केही मारण्यात
आले असून त्यांना घरी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details