महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड महानगरपालिका पोटनिवडणुकीत सहा उमेदवार रिंगणात; नऊ जणांनी घेतली माघार

नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ ड च्या एका रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी ६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

By

Published : Jan 25, 2020, 11:10 AM IST

six-candidates-are-contesting-for-nanded-municipal-corporation-by-election
नांदेड महानगरपालिका पोटनिवडणुकीत सहा उमेदवार रिंगणात

नांदेड -वाघाळा महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ ड च्या एका रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात २४ तारखेला उमेदवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 9 उमेदवारांनी माघार घेतली. ६ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या एका रिक्त जागेसाठी ६ फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यामध्ये ९ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. आता निवडणुकीच्या रिंगणात एकूण ६ उमेदवार आहेत. यामध्ये पठाण जफार अली खान मेहमुद अली खान, अब्दुल अजीज कुरेशी, अब्दुल रजाक, मोहम्मद साबेर चाऊस मोहम्मद नासेर चाऊस, अमर चाऊस मोहम्मद चाऊस, चाऊस मजहर नादरे आणि अब्दुल गफार अब्दुल सत्तार हे सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सहा उमेदवारांसाठी २५ जानेवारीला निवडणुकीचे चिन्ह वाटप केले जाणार आहे. आता या निवडणुकीसाठी सहा उमेदवार रिंगणात असल्यामुळे या निवडणुकीला चांगलीच रंगत भरणार आहेत. महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत असून काँग्रेस पक्षाकडून अब्दुल गफार अब्दुल सत्तार हे भविष्य आजमावत आहेत. निकाला नंतर या जागेचे चित्र स्पष्ट होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details