महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड : जिल्हा रुग्णालयात सिंगापूरचे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर तातडीने रुग्णसेवेत वापरा, पालकमंत्र्यांचे निर्देश

राज्य शासनाने येथील जिल्हा रुग्णालयाला सिंगापूरचे १० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर उपलब्ध करून दिले आहेत. हे कॉन्स्ट्रेंटर तातडीने रुग्णसेवेसाठी वापरण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Singapore's Oxygen Concentrator
Singapore's Oxygen Concentrator

By

Published : May 8, 2021, 2:00 AM IST

नांदेड- राज्य शासनाने येथील जिल्हा रुग्णालयाला सिंगापूरचे १० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर उपलब्ध करून दिले आहेत. हे कॉन्स्ट्रेंटर तातडीने रुग्णसेवेसाठी वापरण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रशासनाला दिले आहेत.


सिंगापूरचे १० कॉन्स्ट्रेंटर नांदेडच्या जिल्हा रूग्णालयाला सुपूर्द -

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑक्सिजनचे उत्पादन आणि साठवणुकीची क्षमता वाढवली जात आहे. दरम्यान, या आणिबाणीच्या परिस्थितीत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी मदतीचा हात पुढे केला असून, सिंगापूरच्या टेमासेक फाऊंडेशन या संस्थेने राज्य शासनाला ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी १० कॉन्स्ट्रेंटर नांदेडच्या जिल्हा रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आले आहेत. या सहकार्यासाठी पालकमंत्री अशोकर चव्हाण यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले आहेत.

ऑक्सिजनसाठी धावपळ होऊ नये म्ह्णून जंबो कोविड सेंटर -

नांदेड जिल्हयातील कोरोनाबाधितांवर तातडीने योग्य उपचार सुरु व्हावेत, त्यांची बेड, ऑक्सिजनसाठी धावपळ होऊ नये, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेऊन नांदेड येथे तत्परतेने जंबो कोविड केअर सेंटर उभारले. त्याशिवाय एसडीआरएफमधून जिल्ह्याला ५२ नव्या रुग्णवाहिका मिळवून दिल्या. त्यानंतर आता नांदेड जिल्ह्याला नवे दहा ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर उपलब्ध झाल्याने रुग्णांसाठीच्या सुविधांमध्ये वाढ झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details