महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अधिग्रहित केलेल्या जमिनींच्या नुकसान भरपाईतील तफावत दूर करा, अशोक चव्हाणांची विधानसभेत मागणी - जमिन अधिग्रहण

नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या राज्य महामार्गासाठी अनेक ठिकाणी जमिनी अधिग्रहित केल्या आहेत. मात्र त्या जमिनीच्या नुकसान भरपाईत तफावत आहे. ती तफावत दूर करण्यात यावी, अशी मागणी आमदार अशोक चव्हाण यांनी विधानसभेत केली.

ashok chavan
अशोक चव्हाण

By

Published : Dec 21, 2019, 12:58 PM IST

Updated : Dec 21, 2019, 1:07 PM IST

नांदेड -जिल्ह्यातून जाणाऱ्या राज्य महामार्गासाठी अनेक ठिकाणी जमिनी अधिग्रहित केल्या आहेत. मात्र त्या जमिनीच्या नुकसान भरपाईतील रकमेत तफावत आहे. ती तफावत दूर करण्यात यावी. यासाठीची मागणी भोकर मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत केली.

राज्य महामार्गासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनींच्या नुकसान भरपाईतील तफावत दूर करा, अशोक चव्हाणांची विधानसभेत मागणी

हेही वाचा... प्रलंबित सीमा प्रश्न सोडवण्यासाठी चीनचे परराष्ट्रमंत्री व अजित डोवाल यांच्यात आज चर्चा

नांदेड जिल्ह्यातील हदगाव, अर्धापूर आणि लोहा तालुक्यात सध्या राज्य महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. परंतु, यासाठी दिलेल्या नुकसान भरपाई संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्याकडे सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत चव्हाण यांनी मांडले.

हेही वाचा... विद्यार्थ्यांकडून गटारांची साफसफाई; संबंधीतांवर कारवाईचे आदेश

जमिनीचा नुकसान भरपाई देताना तालुका व ग्रामीण भागातील किंमतीत तफावत असल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनीपेक्षा खेड्यात असलेल्या जमिनाला अधिक नुकसान भरपाई मिळाल्याचे दिसून आले होते. याबाबत मागील सरकारमधील मुख्यमंत्र्यांकडेही आपण याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बैठक लावून तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या जमिनींना २ गुणांक देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, विभागीय आयुक्तांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात अडथळा आणला. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेतलेला निर्णय लागू करण्यात विभागीय आयुक्त अडथळा आणतात, हे आश्चर्यकारक आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य नुकसान भरपाई मिळवून द्यावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी यावेळी केली.

Last Updated : Dec 21, 2019, 1:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details