नांदेड - जून महिना उलटून गेला तरीही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे जिल्हा अजूनही दुष्काळाच्या छायेत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अद्यापही १५६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर ११२२ ठिकाणी विहीर व बोअरचे अधिग्रहण कायम आहे. पावसाने दडी मारल्यामुळे जिल्हा प्रशासनाने जून अखेरपर्यंत पाणी टंचाईच्या उपाययोजनांना १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे पाणी टंचाईच्या तीव्रतेत वाढ झाली होती. जून महिन्यात केवळ आठ टक्केच पाऊस झाला. यामुळे जिल्हा प्रशासनास ३० जूनला पाणी टंचाईच्या उपाययोजनांना १५ जुलै पर्यंत मुदतवाढ द्यावी लागली.