नांदेड - शिवसेनेचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या हिंगोलीतून नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाटील आज पहिल्यांदा नांदेडला आले. यावेळी विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
शिवसेनेचा बालेकिल्ला पुन्हा करण्यासाठी मला हिंगोलीतून तिकीट - हेमंत पाटील - हिंगोली
शिवसेनेने हिंगोली लोकसभेसाठी नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाटील आज पहिल्यांदा नांदेडला आले. यावेळी विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
आमदार हेमंत पाटील यांचे स्वागत करताना कार्यकर्ते
पाटील यांना शिवसेनेने हिंगोलीतून उमेदवारी दिल्यामुळे त्यांच्या नांदेडच्या समर्थकांनी जल्लोष केला. विशेष म्हणजे यावेळी हिंगोलीतून शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते पाटील यांच्या स्वागतासाठी नांदेडला पोहोचले. यावेळी त्यांनी पक्षाने उमेदवारी दिल्याबद्दल पक्ष नेत्यांचे आभार मानले. तसेच शिवसेनेचा बालेकिल्ला आपल्याकडे पुन्हा आणण्यासाठी उमेदवारी दिली असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.