नांदेड- शहराला पाणीपुरवठा करणारे विष्णुपुरी जलाशय कोरडेठाक पडले आहे. शहराला तब्बल सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नांदेडमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा स्थितीत शिवसेना टंचाईग्रस्त नांदेडकरांच्या मदतीला धावून आली आहे. शिवसेनेचे नेते दत्ता कोकाटे आपल्या शेतातील दोन बोअरवेलचे पाणी शहराला देत आहेत.
दुष्काळग्रस्त नांदेडसाठी शिवसेनेचा हातभार; टँकरद्वारे करतायेत पाणीपुरवठा
मनपात सत्तेत नसलेल्या शिवसेनेने पाण्यासाठी लोकांच्या मदतीला उतरली आहे. केवळ निवडणुका आल्या की सक्रिय होणारे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या प्रमुख तिन्ही पक्षाने शहराला वाऱ्यावर सोडले आहे.
त्यांच्याजवळ असलेल्या तिन्ही टँकरमधून स्वखर्चाने ते शहरात पाणीपुरवठा करत आहेत. नांदेडमध्ये काँग्रेसचे 72 नगरसेवक आहेत, मात्र या सर्वच नगरसेवकांनी पाण्याच्या टंचाईकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे.
मनपात सत्तेत नसलेल्या शिवसेनेने पाण्यासाठी लोकांच्या मदतीला उतरली आहे. केवळ निवडणुका आल्या की सक्रिय होणारे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या प्रमुख तिन्ही पक्षाने शहराला वाऱ्यावर सोडले आहे. शिवसेनेच्या या पाणी पुरवठ्यामुळे काही अंशी का होईना पण नांदेडकरांना दिलासा मिळाला आहे.