महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MP Shrikant Shinde On Sanjay Raut: संजय राऊतांना लोक जागा दाखवतील- खासदार श्रीकांत शिंदे

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'खोका' या विषयावर चित्रपट काढण्याची घोषणा केली आहे. त्यावर शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी जोरदार टीका केली. चिखलामध्ये दगड मारला तर तो आपल्या अंगावर उडतो. त्यांना चित्रपट, गाणे काय काढायचे ते काढू द्या. लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील, असे प्रत्युत्तर खा. शिंदे यांनी नांदेड येथील एका कार्यक्रमात दिले.

By

Published : May 27, 2023, 8:10 PM IST

MP Shrikant Shinde On Sanjay Raut
खासदार श्रीकांत शिंदे

नांदेड: जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील भानेगाव इथल्या कयाधु नदीवर पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आज (शनिवारी) करण्यात आले. या पुलाच्या निर्मितीसाठी बाबूराव कदम यांनी सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळपास वीस कोटी रुपयांचा निधी पुलासाठी मंजूर केला आहे. या पुलाच्या निर्मितीमुळे या भागातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विरोधक हतबल:विरोधक हतबल झाले आहेत. त्यामुळे ते सध्या आव्हान, टीका करीत आहेत. त्यांना टीका करू द्या; परंतु आम्हाला प्रत्येक क्षण हा विकासासाठी घालवायचा आहे. आम्हाला देशाचा विकास करायचा आहे, असे मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.


आजीबाईशी साधला संवाद:नांदेड जिल्ह्यातील भानेगाव इथल्या भूमिपूजन सोहळ्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यासपीठावरून उतरत आजीबाईचे गाऱ्हाणे ऐकले. तसेच तिच्याशी संवादही साधला. दरम्यान, आजीबाईला हवे असलेले घरकुल बांधून देण्याचा शब्द देखील खासदार शिंदेंनी दिला. शिंदे यांच्या या कृतीमुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. यावर बोलताना शिंदे यांनी लोकांचा आमच्यावर असलेला विश्वास यातून सिद्ध होत असल्याची प्रतिक्रिया दिली.

संजय गायकवाड यांचे संजय राऊतांना चॅलेंज: शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर संजय राऊत आणि संजय गायकवाड यांच्यात अनेकवेळा कलगीतुरा रंगलेला पाहतो. आरोप प्रत्यारोप, उत्तर प्रतिउत्तर, दावे प्रति दावे या दोन्ही नेत्यांकडून केले जातात. पण आता थेट संजय गायकवाड यांनी मुंबईत येऊन आपण संजय राऊत यांचे ओपन चॅलेंज देत स्वीकार करू. त्यांच्यातला चोंबडेपणा आपण बंद करू किंवा त्यांनी उत्तराला उत्तर द्यावे, असे चॅलेंज दिले आहे. तसेच पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेला सल्ला त्यांनी ऐकावा आणि काँग्रेस राष्ट्रवादीपासून दूर व्हावे, त्यांना बळी पडू नये, असा पुनरुच्चार केला आहे. आमच्या तर जागा वाढणारच आहेत. पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला किती जागा देते, याचे आत्मपरीक्षण तुम्ही करावे असाही उपरोधिक टोला त्यांनी ठाकरेंना लगावला आहे. तसेच राष्ट्रपती यांना देशातील भाजप शिवसेना पक्षाने एकमताने निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत आम्ही निर्णय योग्य घेतला आहे. आता त्यांच्याबाबत टीका टिपणी इतर पक्षांनी करू नये. असाही इशारा त्यांनी दिला आहे. तर एकंदरीत पुन्हा एकदा संजय राऊत आणि संजय गायकवाड यांच्या चांगला कलगीतुरा रंगत आहे.

हेही वाचा:

  1. BJP Vs Shinde Group : भाजपकडून शिंदेंच्या सेनेवर दबाव अस्त्र; आगामी निवडणुकीत जागा वाटपात मिळणार दुय्यम स्थान
  2. Prahar Jan Shakti Party : प्रहार जनशक्ती पक्षाची अमरावती लोकसभा मतदारसंघावर नजर
  3. NITI Aayog Meeting : पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची बैठक; एकनाथ शिंदे दिल्लीत, अनेक पक्षांचा बैठकीवर बहिष्कार

ABOUT THE AUTHOR

...view details