नांदेड- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात आज सात नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आता नांदेडमधील एकूण बाधितांची संख्या 182 वर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता स्वतःची काळजी घ्यावी. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नांदेडमध्ये आढळले कोरोनाचे सात नवे रुग्ण, जिल्ह्यातील बाधितांची संख्या 182 वर - recovered corona cases in nanded
गुरुवारी दुपारी प्रशासनाला ६९ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८२ वर पोहोचली आहे. त्यापैकी १२६ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. ४८ जणांवर सध्या कोविड रुगणालयात उपचार सुरू आहेत. तर, 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
नांदेडमध्ये बुधवारीएकाच दिवसात कोरोनाचे २३ रुग्ण आढळून आल्याने प्रशासन व नागरिकांची झोप उडाली होती. त्यापाठोपाठ आता गुरुवारी दुपारी प्रशासनाला ६९ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८२ वर पोहोचली आहे. त्यापैकी १२६ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. ४८ जणांवर सध्या कोविड रुगणालयात उपचार सुरू आहेत. तर, 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी आढळलेल्या ७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ५ जण हे यापूर्वी सापडलेल्या कामगार रुग्णाच्या संपर्कातील नातेवाईक आहेत. याशिवाय एक रुग्ण औरंगाबाद, तर दुसरा उमरखेड येथील रहिवासी आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर एनआरआय निवास कोविड सेंटर तसेच शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.