महाराष्ट्र

maharashtra

नांदेडात आढळले कोरोनाचे सात नवे रुग्ण, जिल्ह्यातील बाधितांची संख्या 189 वर

By

Published : Jun 5, 2020, 9:43 PM IST

जिल्ह्यात शुक्रवारी प्राप्त झालेल्या एकूण ४८ अहवालांपैकी ३७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, ७ रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझीटिव्ह आले आहेत. त्यामुळे, जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १८९ झाली आहे. तर, आतापर्यंत १२६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उर्वरित ५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

seven new corona cases found in nanded
नांदेड कोरोना अपडेट

नांदेड- जिल्ह्यात शुक्रवारी प्राप्त झालेल्या एकूण ४८ अहवालांपैकी ३७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, ७ रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझीटिव्ह आले आहेत. त्यामुळे, जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १८९ झाली आहे. तर, आतापर्यंत १२६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उर्वरित ५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

या 55 रुग्णांपैकी ३ रुग्णांची प्रकृती गंभार आहे. यात दोन स्त्रियांचा समावेश असून एकीचे वय ५२ तर एकीचे ६५ वर्ष आहे. याशिवाय यात एका ३८ वर्षांच्या पुरुषाचाही समावेश आहे. आज प्राप्त झालेल्या ७ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी पलाईगुडा येथील एका 33 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर, इतर ६ रुग्ण हे नईआबादी, शिवाजीनगर व खय्युम फ्लॅट परिसरातील आहेत. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे.


कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती -

• आत्तापर्यंत एकूण संशयित - 4302
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 4067
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2231
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 102
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 104
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -3963
• आज घेतलेले नमुने - 46
• एकूण नमुने तपासणी- 4316
• एकूण पॉझिटीव्ह रुग्ण- 189
• पैकी निगेटीव्ह - 3825
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 71
• नाकारण्यात आलेले नमुने - 55
• अनिर्णित अहवाल – 171
• उपचारानंतर घरी परतलेले रुग्ण - 126
• कोरोनाबाधित मृतांची संख्या – 8

ABOUT THE AUTHOR

...view details