नांदेड -राजकारणात बंडखोरीमुळे ( Shiv Saina Rebellion ) काही काळ खळबळ माजत असली तरी बंडखोराला त्याचा फार लाभ होत नाही असा दावा नांदेडचे ज्येष्ठ शिवसैनिक धोंडू पाटील यांनी केला. सध्याच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर धोंडू पाटील ( Dhondu Patil ) यांनी नांदेड जिल्ह्यातील बंडखोरीचा आढावा घेतला. जिल्ह्यात शिवसेनेची ( Shiv Sainik ) पाळंमुळं रुजू लागल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांनी डॉ. डी. आर. देशमुख यांना उमेदवारी दिली. मराठा समाजातील डॉ. देशमुख यांना शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडून दिले. १९९५ च्या विधान सभा निवडणुकीत शिवसेनेने सोनार समाजातील प्रकाश खेडकर यांना उमेदवारी दिली. त्यावेळी जिल्ह्यात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजातील लोकांनी नाराजी व्यक्त केली. डॉ. देशमुख यांनी बंडखोरी करून प्रकाश खेडकर यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली.परंतु शिवसैनिकांच्या अथक परिश्रमामुळे खेडकर विजयी झाले. बंडखोर डॉ देशमुख यांना पराभव पत्करावा लागला.
बंडखोराला लाभ होत नाही -१९९५ साली शिवसेनेशी बंडखोरी करणारे डॉ देशमुख पुन्हा मुख्य राजकीय प्रवाहात कधीच आले नाहीत. शिवसेनेशी एकनिष्ठ राहणारे प्रकाश खेडकर सलग दोनवेळा आमदार झाले. २००४ मध्ये तयांचया मृत्यूनंतर खेडकर यांच्या पत्नी अनुसया खेडकर आमदार झाल्या. मराठा समाजातील असूनही डॉ देशमुख केवळ बंडखोरीमुळे राजकारणातून हद्दपार झाले. अल्पसंख्य असलेल्या सोनार समाजातील असूनही केवळ शिवसेनेवरील निष्ठेमुळे खेडकर पतिपत्नी आमदार झाले असेही धोंडू पाटील म्हणाले.