महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमधील कॉफी शॉपवर दुसऱ्यांदा धाड; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल - कॉफी शॉपवर दुसऱ्यांदा धाड

सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शहरातील राज मॉल जवळील युवा कॉफी शॉप येथे तपासणी केली.

नांदेड पोलीस
नांदेड पोलीस

By

Published : Aug 22, 2021, 10:01 PM IST

नांदेड -शहरातील विमानतळ पोलिसांनी दुसऱ्यांदा एका कॉफी शॉपवर छापा टाकून असभ्य वर्तन करणाऱ्या सहा जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शहरातील राज मॉल जवळील युवा कॉफी शॉप येथे तपासणी केली. यात सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी कॅफे चालक परमज्योतसिंह पप्पूसिंह दिघवा (वय-18 ), ग्राहक अक्षय सोनबाराव आरणे (वय 20 रा. नारायणनगर नांदेड), सचिन विठ्ठल मजरे (वय 27, रा. बारूळ ता. कंधार) अनिकेत सोनबाराव आरणे (वय 21, रा. नारायणनगर नांदेड), निलेश परमेश्वर इंगळे (वय18, रा. शिवनगर नांदेड), अक्षय हरबा शिंदे (वय-26 रा. चैतन्यनगर नांदेड) यांच्या विरोधात कलम 110/117 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -संत्र्याला चार हजार रुपये प्रतिहेक्टर प्रीमियम द्यावा; माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details