महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड : हिमायतनगर शहरात डेंग्यूचा दुसरा बळी

शहरातील बजरंग चौकामध्ये राहणाऱ्या बास्टेवाड कुटुंबामधील रुपाली भारत बास्टेवाड (वय १६) हिला चार दिवसापूर्वी ताप आला होता. तिच्यावर हिमायतनगरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर गुरुवारी तिला नांदेडला हलविण्यात आले होते.

By

Published : Nov 24, 2019, 10:26 AM IST

नांदेड : हिमायतनगर शहरात डेंग्यूचा दुसरा बळी

नांदेड -हिमायतनगर शहरातील बजरंग चौक भागातील दहावीत शिकणाऱ्या मुलीचा डेंग्यूमुळे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. डेंग्यूमुळे शहरात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

नांदेड : हिमायतनगर शहरात डेंग्यूचा दुसरा बळी

हेही वाचा - डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा दिशाभूल करणारा; शासन दरबारी 49, प्रत्यक्षात विविध रुग्णालयात 50-50 रुग्ण

हिमायतनगर शहरात नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सर्वच प्रभागामध्ये नाल्या तुंबल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य झाले आहे. चौकाचौकात कचरा साचला आहे. मोकाट जनावरे, डुकरांचा मुक्त संचार होऊन सर्वत्र घाणीमुळे दुर्गंधी पसरली आहे. परिणामी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होऊन अनेकांना डेंग्यू, मलेरिया यासह विविध विषमज्वराचा सामना करावा लागत आहे. शहरातील बजरंग चौकामध्ये राहणाऱ्या बास्टेवाड कुटुंबामधील रुपाली भारत बास्टेवाड (वय १६) हिला चार दिवसापूर्वी ताप आला होता. तिच्यावर हिमायतनगरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर गुरुवारी तिला नांदेडला हलविण्यात आले होते.

हेही वाचा - औरंगाबाद शहरात डेंग्यूचे 11 बळी; 180हून अधिक संशयित रुग्ण

दरम्यान, डेंग्यूच्या तापामुळे उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. या अगोदर वर्षभरापूर्वी भारत बास्टेवाड यांचाही मृत्यू झाला होता. आता रुपालीचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details