नांदेड - कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला आहे. नांदेड शहरातील अबचलनगरमध्ये हा दुसरा रुग्ण आढळला असून जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर यांनी याला दुजोरा दिला आहे. या रुग्णाला नांदेडमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता नांदेडचा धोका वाढण्याची चिन्हे आहेत.
नांदेडमध्ये आढळला कोरोनाचा दुसरा रुग्ण, धोका वाढण्याची चिन्हे... - corona update
पाच दिवसापूर्वी नांदेडच्या पीरबुऱ्हाण नगर परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. पण, त्याच्या संपर्कातील ८० च्यावर नातेवाईकांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे मोठा धोका टळला होता.
नांदेडमध्ये आढळला कोरोनाचा दुसरा रुग्ण, धोका वाढण्याची चिन्हे...
पाच दिवसापूर्वी नांदेडच्या पीरबुऱ्हाण नगर परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. पण, त्याच्या संपर्कातील ८० च्यावर नातेवाईकांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे मोठा धोका टळला होता. मात्र, अचानकपणे रविवारी रात्री अजून एक कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे नांदेडचा धोका वाढला आहे. नांदेड शहरातील अबचलनगरमध्ये हा रुग्ण आढळला असून जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्या रुग्णावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.