नांदेड- येथील अर्धापूर-मालेगाव महामार्गावर शाळेच्या दोन स्कूल बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर सहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी वसमत फाटा-मालेगाव रस्त्यावर घडली. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अर्धापूर-मालेगाव महामार्गावर स्कूल बसचा अपघात; एकाचा मृत्यू, सहा जखमी - नांदेड बातमी
वसमत फाटा-मालेगाव रोडवर छोटा हत्ती (एम. एच. २६ ए. एफ. - २२८२) विद्यार्थ्यांना घेऊन मालेगावकडे जात होता. तेवढ्यात एक ओमिनी (एम. एच. २६ ए. एफ. ०१७२) ही मालेगावकडून वसमत फाट्याकडे येत होती. या दोन्ही स्कूल बस मेंढलापाटी नजिक येताच त्यांची समोरासमोर जोराची धडक झाली.
हेही वाचा-येणाऱ्या विधानसभेत विरोधी पक्षनेता वंचित आघाडीचा असेल; मुख्यमंत्र्यांची भविष्यवाणी
वसमत फाटा-मालेगाव रोडवर छोटा हत्ती (एम. एच. २६ ए. एफ. - २२८२) विद्यार्थ्यांना घेऊन मालेगावकडे जात होता. तेवढ्यात एक ओमिनी (एम. एच. २६ ए. एफ. ०१७२) ही मालेगावकडून वसमत फाट्याकडे येत होती. या दोन्ही स्कूल बस मेंढलापाटी नजिक येताच त्यांची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात ओमीनीमधील प्रतिक संजय वाघमारे (वय १९) हा गंभीर जखमी झाला. त्याला शासकिय रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांकडून त्याला मृत घोषित केले. तर सहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.