महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 18, 2020, 2:58 AM IST

ETV Bharat / state

इंदोरीकर महाराजांनी मनाला लावून घेवू नये : सत्यपाल महाराज

प्रसिद्ध सप्त खंजिरीवादक समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी इंदोरीकर महाराजांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

सत्यपाल महाराज
सत्यपाल महाराज

नांदेड- एका किर्तनात मुला-मुलीच्या जन्मासंदर्भात इंदोरीकर महाराजांनी केलेल्या विधानावरून वादंग सुरू आहे. यावर प्रसिद्ध सप्त खंजिरीवादक समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सर्व प्रकरण इंदोरीकर महाराजांनी मनाला लावून घेवू नये, असे त्यांनी म्हटले.

इंदोरीकर महाराजांनी मनाला लावून घेवू नये : सत्यपाल महाराज

इंदोरीकर महाराज यांनी या गोष्टी जास्त मनाला लावून घेऊ नये. हिंमत ठेवावी. मी माझ्या पद्धतीने मांडतो. तसेच ते त्यांच्या पद्धतीने मांडतात. 'प्रसन्न हवा, पाणी, ऋतू तोच आमचा चांगल्या कामाचा मुहुर्त' आणि याच पद्धतीने मी जीवन जगले आहे. त्यामुळे इंदोरीकर महाराजांनी जास्त मनाला लावून घेऊ नये, व त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांची बेधडक उत्तर द्यावी, असे सत्यपाल महाराज म्हणाले.

सत्यपाल चिंचोलीकर हे सत्यपाल महाराज नावाने प्रसिद्ध आहेत. हे महाराष्ट्रातील समाज प्रबोधक कीर्तनकार आहेत. महाराज सप्तखंजिरीच्या माध्यमातून ग्रामस्वच्छतेचा संदेश देतात. तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या विचारांनी ते प्रेरित आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी स्वच्छता, अंधश्रद्धा, जातिभेद, व्यसनमुक्ती, घनकचरा नियोजन, स्त्री भ्रूणहत्या, शिक्षणाचे महत्त्व, हगणदारी मुक्त गाव या विषयी जागरूकता पसरवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details