महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संस्कृती संवर्धन शिक्षण संस्थेचा स्तुत्य निर्णय; कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांचे घेणार पालकत्व - sanskruti organization Initiative nanded

कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांचे पालकत्व घेण्यासाठी नांदेड येथील एक सेवाभावी संस्था पुढे आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत घरातील कर्त्या व्यक्तींचे प्राण गेले. त्यामुळे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. संस्कृती संवर्धन संस्थेच्या पुढाकाराने कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांना सहारा मिळणार आहे.

Orphan Children sanskruti organization
अनाथ पालकत्व संस्कृती संवर्धन शिक्षण संस्था

By

Published : Jun 21, 2021, 5:06 PM IST

नांदेड - कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांचे पालकत्व घेण्यासाठी नांदेड येथील एक सेवाभावी संस्था पुढे आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत घरातील कर्त्या व्यक्तींचे प्राण गेले. त्यामुळे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. संस्कृती संवर्धन संस्थेच्या पुढाकाराने कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांना सहारा मिळणार आहे.

माहिती देताना विद्यार्थिनी, नातेवाईक आणि संस्कृती संवर्धन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष

हेही वाचा -'विमा कंपन्या मालामाल अन् शेतकऱ्यांचे हाल, मग पीक विमा भरावा कशाला?'

संस्कृती संवर्धन शिक्षण संस्थेची सामाजिक बांधिलकी-

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशासह महाराष्ट्राला मोठा फटका बसला. यात हजारो नागरिकांचा जीव गेला. या काळात अनेकांच्या डोक्यावरील छत्रछाया हरवली. यामुळे सर्वसामान्य कुटुंबांपुढे मुलांच्या शिक्षणाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. अशा कुटुंबांतील अनाथ मुलांचे पालकत्व घेण्याचा मानस नांदेड जिल्ह्यातील संस्कृती संवर्धन शिक्षण संस्थेने घेतला आहे.

पोरके झालेल्या मुलांना मिळणार शिक्षण-

बिलोली तालुक्यातील साधना शिंदे या मुलीला कोरोनाचा फटका बसला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत साधनाच्या आईचे कोरोनामुळे निधन झाले. घरातील कर्ता व्यक्तीच सोडून गेल्याने पुढील आयुष्य अंधकारमय झाले होते. मात्र, संस्कृती संवर्धन संस्थेने दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे तिच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

संस्कृती संवर्धन शिक्षण संस्थेच्या औदार्यामुळे या मुलांना हक्काचं घर-

नांदेड जिल्ह्यातील संस्कृती संवर्धन शिक्षण संस्था ही मागील साठ वर्षांपासून संकट काळात धावून येते. कोरोना काळात देखील या संस्थेने गरजू कुटुंबाना मदत केली. तर, आता कोरोना काळात अनाथा झालेल्या मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात पोरके झालेल्या मुलांसाठी सरकार दरबारी अजूनतरी न्याय मिळालेला नाही, मात्र संस्कृती संवर्धन शिक्षण संस्थेने दाखवलेल्या औदार्यामुळे या मुलांना हक्काचे घर मिळाले आहे.

हेही वाचा -धक्कादायक! चार दिवसाच्या नकोशीला फेकले रस्त्याच्या बाजूला

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details