नांदेड :सीमावादाचे लोण सांगली -सोलापूरातून मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात आले आहे. सीमावर्ती (borderline area in Nanded) देगलूर, बिलोली, धर्माबाद तालुक्यातील जवळपास ३० गावांत मुलभूत सुविधा मिळत नसल्याने, तेलंगणात जाण्यासाठी ७ ते १० डिसेंबर या कालावधीत ३० गावात (start on Wednesday in 30 villages) संपर्क संवाद यात्रेचे (Sanpark Samvad Yatra) आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेचा दिनक्रम :या यात्रेची सुरुवात 7 डिसेंबर रोजी बुधवारी सकाळी ८:३० वाजता मौजे हाेट्टल (ता. देगलूर) येथील सिद्धेश्वर मंदिरात नारळ फोडून होणार आहे. त्यानंतर संवाद संपर्क यात्रा येरगी, नागराळ, भक्तापूर, देगलूर, हनुमान हिप्परगा, नरंगल करून यात्रेकरूंचा सांगवी उमर येथे मुक्काम असणार आहे. गुरुवारी (दि. ८) संपर्क यात्रा अभियानाची सुरुवात, मेदनकलुर येथून होऊन तमलुर शेळगाव, शेवाळा, थडी हिपरगा तळी, दौलतापूर, रात्री सगरोळी येथे मुक्कामास असणार आहे. शुक्रवारी 9 डिसेंबर रोजी यात्रा बाेळेगाव, कारला पुर्नवसन, येसगी, कारला बुद्रुक, गंजगाव माचनूर, गंजगाव, माचनूर, हुनगुंदा, रात्री नागणी येथे मुक्कामास असणार आहे. शनिवार दिनांक 10 डिसेंबर संगम (ता. बिलोली) येथे यात्रेच्या समारोप कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी सीमा भागातील आजी-माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थिती राहणार असल्याची माहिती संपर्क संवाद अभियान समितीकडून देण्यात आली आहे.
या आहेत मागण्या : शेतीला २४ तास मोफत वीजपुरवठा, मुलीच्या लग्नाकरिता लक्ष्मी कल्याण योजना, शेतकऱ्यांना प्रति एकर १२०००/ रुपये दरवर्षी दिले जावेत, खते कीटकनाशक औषधी ५० ℅ टक्के अनुदानावर देण्यात यावीत, घरकुल योजनेत पाच लाखापर्यंत घर बांधून दिले जावे, मागणी करेल त्याला शेळ्या मेंढ्या मोफत पुरवठा करणे, मागासवर्गीयांना व्यवसाय करिता दहा लाखाचे अनुदान देणे, वयोवृद्धांना दरमहा २०००/ रुपये मानधन दिले जावे. दिव्यांगांना दरमहा ३००० रुपये मानधन देण्यात यावे, दुध डेअरीकरिता पाच लाखाचे राेख अनुदान, यासह इतर १२ मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.
यात राजकारण : सीमा भागातील एकही गाव तेलंगणा राज्यात जाऊ इच्छित नाही, काही लोक यात राजकारण करत आहेत, असा आरोप नांदेडचे खासदार प्रताप पाटील यांनी केला आहे. खासदार चिखलीकर पत्रकारांशी बोलताना सीमावर्ती भागातील प्रश्न सोडवण्यासाठी, आपण स्वतः प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यापूर्वी आमचे सरकार नव्हते. आता गावकऱ्यांच्या समस्या समजावून घेतल्या जातील, असे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले.