नांदेड : महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न चालणार नाही, इथे फक्त मोदी पॅटर्न चालणार,असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा खासदार संजय राऊत यांनी आज समाचार घेतला. फडवणीसांना बोलू द्या, त्यांच्या बोलण्याने आमच्या जागा वाढतायत, महाराष्ट्रातदेखील सत्ता परिवर्तन होईल, अशा शब्दात राऊत यांनी फडणवीसांचा समाचार घेतला. जागा वाटपाचा आकडा आपल्याला माध्यमांकडून समजला असल्याचेही संजय राऊत यावेळी म्हणाले. पण त्याचवेळी राऊतांनी लोकसभेच्या जागेविषयी ठाकरे गटाच्या शिवसेनेची महत्त्वकांक्षाही सांगितली. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे संजय राऊत माध्यमांशी बोलत होते.
कार्यक्रत्यांकडून जंगी स्वागत : शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत हे आजपासून नांदेड दौऱ्यावर आहेत. खासदार संजय राऊत अनेक वर्षांनी नांदेडमध्ये आल्याने शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. संजय राऊतांना पाहण्यासाठी देगलूरमध्ये प्रचंड गर्दी जमा झाली होती. यावेळी तेलंगणा सीमेवर शिवसैनिकांनी मोटारसायकल रॅली काढत त्यांचे स्वागत केले. बँड बाजा आणि फटाक्याची आतिषबाजी करत संजय राऊत यांचे स्वागत करण्यात आले.
फडणवीसांवर राऊतांची टीका : महाराष्ट्रात फक्त मोदी पॅटर्न चालेले विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्याला संजय राऊत यांनी नांदेडमध्ये उत्तर दिले. लोकसभा विधानसभा च्या निवडणुका महविकास आघाडी च्या व्रज मुठी खालीच लढवल्या जातील बेकायदे शिर सरकार वाले काही म्हणून आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत आणि होणार ही नाही सध्या च्या घटना बाह्य सरकारला सते वरून खाली खेचू. फडणवीसांनी काल पुण्याच्या सभेमध्ये शरद पवार यांच्या पुस्तकातील 10 वाक्य वाचून दाखवली. त्याच पुस्तकात फडणवीस यांच्या संबंधित सुद्धा वाक्य होती तीही वाचायला हवी होती. पुण्याच्या सभेत काही पदाधिकारी झोपल्याचे व्हिडिओ फोटो व्हायरल होत आहेत, त्यावरही चर्चा करावी. असेही संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या वाक्यावरून फडणवीस यांनी खील्ली उडवण्याचा प्रयत्न केला. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी त्यांचाच पोपट मेलाय असे वक्तव्य केले आहे.
माध्यमांकडून जागेचा आकडा समजला : लोकसभेसाठी सोळा सोळाचा फार्मूला ही बातमी मी तुमच्याकडून ऐकतोय, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. जागा वाटपाचा कुठलाही फार्मूला अध्याप ठरला नसून यावर चर्चा सुरू असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आता लोकसभा जागा वाटपासंदर्भात आता प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. पवार साहेबांसोबत आमती बैठक झाली त्यात बैठका कोणी घ्यायच्या, कशा घ्यायच्या काय सूत्र असावीत, यावर नक्कीच चर्चा झाली आहे. पण अजून जागा वाटपाचा आकडा ठरलेला नाही, तुम्ही आता नवीन आकडा देत आहेत स्वागत आहे. लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका महविकास आघाडीच्या व्रजमूठ खालीच लढवल्या जातील. बेकायदेशीर सरकारवाले काही म्हणत असले तरी आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. तसेच होणारही नाही, सध्याच्या घटनाबाह्य सरकारला सत्तेवरून खाली खेचू असे राऊत म्हणालेत.