महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Biyani Murder Case : संजय बियाणींच्या शार्प शुटरला अखेर अटक, दिल्ली सेलची गुजरातमध्ये कारवाई - Sanjay Biyani Murder

बांधकाम व्यावसायिक ( Construction businessman Sanjay Biyani case ) संजय बियाणी यांच्या ( Sanjay Biyani Murder Case ) खुनातील शार्प शुटरला अखेर तब्बल सहा महिन्यांनंतर अटक ( Sanjay Biyani sharp shooter arrested ) करण्यात दिल्ली पाेलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन सेलने यश मिळविले आहे.

Sanjay Biyani Murder Case
संजय बियाणींच्या शार्प शुटरला अखेर अटक

By

Published : Oct 8, 2022, 5:12 PM IST

नांदेड : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या ( Sanjay Biyani Murder Case ) खुनातील शार्प शुटरला अखेर तब्बल सहा महिन्यांनंतर अटक ( Sanjay Biyani sharp shooter arrested ) करण्यात दिल्ली पाेलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन सेलने यश मिळविले आहे. गुरुवारी रात्री गुजरात राज्यात ही अटक झाली आहे. दिव्यांशू पिता रामचेत (२३), रा. पुराबाजार, ता.जि. अयाेध्या, उत्तर प्रदेश असे या शुटरचे नाव ( Divyanshu Ramchet arrested ) आहे.

दिव्यांशूने स्वत: बियाणींवर झाडल्या गोळ्या -नांदेडात ५ एप्रिल २०२२ राेजी संजय बियाणी यांची त्यांच्या येथील राहत्या घरासमाेर भरदिवसा गाेळ्या झाडून हत्या करण्यात आली हाेती. गाेळ्या झाडणाऱ्या दाेन शुटर्सपैकी एक दिव्यांशू हा आहे. घटनेच्या वेळी ताे गाडी चालवीत हाेता. त्याने स्वत: बियाणींवर आपल्या रिव्हाॅल्व्हरमधून पहिली गाेळी झाडली. एवढेच नव्हे तर बियाणी खाली पडल्यानंतरही त्यांच्यावर दाेन्ही शुटर्सने पुन्हा गाेळ्या झाडल्या.

दिव्यांश १४ वा आराेपी -संजय बियाणी खून प्रकरणात नांदेड एसआयटीने आतापर्यंत १३ आराेपींना अटक केली असून, दिव्यांश हा १४ वा आराेपी आहे. या १३ आराेपींविराेधात शनिवारी ८ ऑक्टाेबर राेजी नांदेडमधील विशेष माेक्का न्यायालयात अडीच हजार पानांचे दाेषाराेपपत्र दाखल केले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी कुख्यात रिंदा हा बियाणी यांच्या खुनाचा मास्टरमाइंड आहे. त्यालाही आराेपी बनविण्यात आले आहे.


महाराष्ट्रातील एटीएस, नांदेड जिल्हा पाेलीस दलाचे विशेष तपास पथक (एसआयटी), दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, स्पेशल टास्क फाेर्स, इन्टेलिजन्स ब्युराे, एनआयए आदी राज्य संस्था या शुटर्सच्या मागावर हाेत्या. अखेर दिल्ली पाेलिसांना त्यात यश आले. नांदेड एसआयटीचे प्रमुख विजय कबाडे, सहायक पाेलीस अधीक्षक अर्चित चांडक, पाेलीस निरीक्षक तांबे, सहायक पाेलीस निरीक्षक चंद्रकांत पवार आदी मंडळी विविध राज्यांतील पाेलिसांच्या संपर्कात हाेती.

इंटेलिजन्सचे मुख्यालय बाॅम्बने उडविले -पंजाबमधील माेहाली येथे स्थानिक पाेलिसांच्या इंटेलिजन्स ब्युराेचे (सीआयए) मुख्यालय आहे. ९ मे २०२२ राेजी हे मुख्यालय आरपीजी फायर करून उडवून देण्यात आले हाेते. या प्रकरणात दिव्यांशू आराेपी आहे. या स्फाेटानंतर ताे मध्य प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश नंतर नेपाळमध्ये पळून गेला हाेता. सहा महिन्यांपासून ताे पाेलिसांना चकमा देत हाेता. त्याच्यावर खून, खंडणी, देशविघातक कारवाया यासारखे अनेक गुन्हे विविध राज्यात दाखल आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details