नांदेड -दोन वर्ष कोरोनाच्या हाहाकारात गेले. अडीच हजार मृत्यू, सव्वा लाखाहून अधिक बाधित झाले. २०२२ साल हे मात्र कोरोना निर्बंधमुक्त गेले. लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम, यात्रा हे सर्व धुमधडाक्यात पार पडले. मात्र काही वाईट घटना देखील घडल्या. नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी ( Sanjay Biyani murder ) यांची ५ एप्रिल रोजी भरदिवसा घरासमोर दोघांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. पाकिस्तानात दडून असलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी कुख्यात मोस्ट वाँटेड हरविंदर संधू ( International Terrorist Harvinder Sandhu ) उर्फ रिंदाचा त्यात सहभाग उघड झाला. तो खूनाचा मास्टरमाईंड ठरला. एनआयए, आयबी, एटीएस तसेच ५ राज्यांचे पोलीस त्याच्या शोधात आहेत. अलीकडेच त्याचा विषबाधेने मृत्यू झाल्याची चर्चा असली तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. बियाणी खूनातील दोन्ही शार्पशुटरवर हरीयाणाच्या मोहाली येथे इंटलिजन्स ब्युरोचे मुख्यालय बॉम्बने उडवून दिल्याचाही आरोप आहे. संजय बियाणी यांचा हत्यानंतर व्यापारी वर्गात दहशत बसली होती. मात्र अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी 56 दिवसात तब्बल 16 आरोपीला अटक करून मोक्का अंतर्गत कारवाई केली
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यात - काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi Bharat Jodo Yatra ) यांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सुरु केलेली भारत जोडो पायदळ यात्रेची ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्याच्या देगलूर येथून महाराष्ट्रात एन्ट्री झाली. जिल्हयात ५ दिवस ही यात्रा मुक्कामी होती. हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणामार्गे ही यात्रा मध्यप्रदेशात पोहोचली. पाच जिल्ह्यातून गेलेल्या या यात्रेत अखिल भारतीय व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी सहभागी झाले होते. जनसामान्यांचा उत्स्फूत प्रतिसाद या यात्रेला राज्यात मिळाला. यात्रेमुळे एकूणच काँग्रेसमध्ये नवचैतन्य आल्याचे चित्र पहायला मिळाले.भारत जोडो यात्रेने कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मिळाले स्फुरण
भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात - कन्याकुमारीपासून सुरु झालेली खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली. हाती मशाल घेऊन लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक राहुल गांधी यांच्यासोबत होते. राज्यातील सर्वाधिक चार मुक्काम नांदेडात असलेल्या या भारत जोडो यात्रेने कार्यकत्यांची मने जोडण्याचेही काम केले. स्थानिक कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा मिळाली. नव्या दमाच्या गड्यांना अधिक महत्त्व यात्रेत दिल्याचे दिसून येत होते. काँग्रेस संस्कृतीत ज्येष्ठांना पुढे केले जायचा पायंडा मोडीत काढून युवा नेत्यांना संधी दिली जात असल्याची जाणीव यात्रेतून झाली. तळागाळातील कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.