नांदेड -येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली ( Sanjay Biyani Murder Case ) होती. त्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला नांदेडमधून अटक केली आहे. तर, तीन आरोपींवर मोक्का अंतर्गत न्यायालयीन कोठडी सुनावली ( Sanjay Biyani Murder Case Mocca Three More )आहे.
संजय बियाणी हत्येप्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली होती. त्यात आता एका आरोपीला नांदेडमधून अटक करण्यात आली आहे. रणजीत सुभाष मांजरमकर ( वय, २५ रा. पौर्णिमानगर ), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रणजीत गोलू मंगनाळे याचा मित्र आहे. त्याच्या घरातून 2 अग्निशस्त्र, 57 काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर 20 जून पर्यंत मोक्का अंतर्गत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच, तिहार जेलमधून आणलेले 2 आरोपी राजपाल सिंग चांद्रवत ( वय, 29), योगेश कैलाशचंद भाटी ( वय, 25 ) यांना सुद्धा 20 जून पर्यंत मोक्का कोठडी सुनावण्यात आली आहे.