नांदेड - येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची ५ एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली ( sanjay biyani murder case ) होती. याप्रकरणात आत्तापर्यंत ९ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 1 जूनला सुनावलेली 10 दिवसांची पोलीस कोठडी आज ( 10 जून ) संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तेव्हा न्यायलायने आरोपींना पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ( sanjay biyani murder case accused police custody ) आहे.
नांदेड शहरातील शारदानगर येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिलला गोळ्या झाडून हत्या केली होती. तब्बल 55 दिवस तपास केल्यानंतर पोलिसांनी या हत्येचा उलगडा करता आला. सहा राज्यांत तपास तसेच तीन देशांत पत्रव्यवहार करुन या तपासाची कडी जोडण्यात आली. सर्वत आधी सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर तीन आरोपींना अटक करुन पोलीस कोठडीत पाठवले. आज त्यांची पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर आता 9 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अद्यापही काही आरोपी पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती एसआयटीचे प्रमुख तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी दिली आहे.