नांदेड- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन लागू असून जिल्हाच्या सीमाली सील आहेत. मात्र, जिल्ह्यातील हदगांव शहरात अंतर जिल्हाबंदीचा बोजवारा उडाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील रेती माफिया बिनधास्तपणे हदगावचा कोथळा वाटेगाव रस्ता वापरत आहेत. त्यामुळे प्रशासनाचे याकडे अर्थपूर्ण संबंधामुळे दुर्लक्ष असल्याची चर्चा होत आहे.
बंद केलेला रस्ता रेतीमाफियांनी केला सुरू... जिल्हाबंदीचा उडाला बोजवारा - corona virus update maharastra
नांदेड जिल्ह्यातील हदगांव शहरात अंतर जिल्हाबंदीचा बोजवारा उडाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील रेती माफिया बिनधास्तपणे हदगावचा कोथळा वाटेगाव रस्ता वापरत आहेत.
हेही वाचा-''लॉकडाऊन काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करणार"
या रस्त्याने रेतीची चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याच रस्त्याने एखाद्या कोरोना रुग्णांचा हदगावमध्ये शिरकाव होईल, अशी भीती हदगावकर व्यक्त करत आहेत. रेती माफियांच्या व महसूल विभागाच्या अर्थपूर्ण संबंधामुळे प्रशासनाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा हदगाव शहरात रंगत आहे. यवतमाळ जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. निदान याची खबरदारी तरी आता जिल्हाधिकारी घेऊन तत्काळ पावले उचलतील, अशी अपेक्षा हदगावकरांना आहे. याबाबत जागरुक नागरिकांनी तक्रारी करुनही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.