नांदेड - मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडतर्फे रास्ता रोको करण्यात आला. लोहा तालुक्यातील कौठा फाटा येथे नांदेड-हैदराबाद रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आले.
संभाजी ब्रिगेडचे नांदेड-हैदराबाद रस्त्यावर रास्तारोको.. हेही वाचा -भाजपचे अहमदपुरात अर्धनग्न आंदोलन, दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार मदतीची मागणी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी संभाजी ब्रिगेड संघटनेकडून रास्तारोको करण्यात आला. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत राज्य लोकसेवा आयोगासह कोणत्याही स्पर्धा परीक्षा घेऊ नये. हाथरस बलात्काऱ्यांना फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तब्बल दोन तास चालेल्या आंदोलनामुळे नांदेड-हैदराबाद रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.
या वेळी, संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे, जिल्हाध्यक्ष शाम पाटील, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, विधानसभा अध्यक्ष माधव घोरबांड, अंकुश कोल्हे यांची उपस्थिती होती.
हेही वाचा -'आम्हीच खरे ओबीसी' म्हणत निलंग्यात अठरापगड जातींचे धरणे आंदोलन