महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये गोवर्धनघाट पुलावर एकाला लुटले, गुन्हा दाखल - robbery by two people in nanded

नांदेड जिल्ह्यातील कौठा ते गोवर्धन घाट पुलावर एका इसमाची दोन तरुणांनी लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत. मात्र, तरीदेखील गुन्हेगारांना रोखण्यात पोलीस यंत्रणा असमर्थ ठरत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

नांदेडमध्ये गोवर्धनघाट पुलावर एकाची लुट, गुन्हा दाखल

By

Published : Sep 16, 2019, 1:11 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील कौठा ते गोवर्धन घाट पुलावर एका व्यक्तीला दोन तरुणांनी लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत. मात्र, तरीदेखील गुन्हेगारांना रोखण्यात पोलीस यंत्रणा असमर्थ ठरत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा -'स्वतःची कातडी वाचवण्यासाठी त्यांनी पक्षबद्दल केले'

शहरातील कौठा भागात राहणारे कैलास नानाराव पवार हे भावसार चौकाकडे जाण्यासाठी रविवारी पहाटे ५ वाजता घरातून निघाले होते. रस्त्यात ऑटो न मिळाल्याने ते पायी कौठा ते गोवर्धन घाट पुलावरुन जात होते. तेव्हा काळया रंगाच्या शाईन होंडा दुचाकी क्रमांक एम.एच.८४९४ वरुन दोन अनोळखी तरुण तेथे आले. त्यांनी कैलास यांना पुलाच्या कठड्यावर बसवले. यानंतर त्यांच्याजवळ असलेला ऐवज काढून द्यावे अन्यथा नदीत फेकण्याची धमकी दिली. तसेच कैलास यांच्या पॅन्टच्या खिशात हात घालून रोख ५३०० रुपये, नोकीया कंपनीचा मोबाईल असा ऐवज जबरीने काढून लूट केली.

हेही वाचा -शिवसेनेला भाजप किंमत देत नाही - खासदार सुप्रिया सुळे

दरम्यान, पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख जावेद करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details