नांदेड -प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे. आज सकाळी सहा वाजता सायकल रॅली काढून प्रादेशिक परिवहन विभागाने या अभियानाला सुरुवात केली. विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांम्बोली यांच्याहस्ते या रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. जिलाधिकारी कार्यालय, वजीराबाद चौक, आयटीआय, वर्कशॉप, आनंदनगर मार्गे आयटीआयपर्यंत ही सायकल रॅली काढण्यात आली होती. या सायकल रॅलीत जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाले, परिवहन विभागाचे अधिकारी शैलेश कामत, अविनाश राऊत, महापालिकेचे उपायुक्त शुभम क्यातमवार यांनी सहभाग घेतला होता.
१८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन -