महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Stolen Power Supply : चोरीच्या विद्युत पुरवठ्यावर महसूल मंत्र्यांचा सत्कार - चोरीचा वीज पुरवठा

नांदेडमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil ) यांचा सत्कार करण्यासाठी चक्क चोरी करून विजेचा वापर झाल्याचे उघड झाले आहे. हदगांव तालुक्यातील वाळकी बाजार येथे त्यांच्या नागरी सत्कारात हा चोरीचा प्रकार उघड ( Electricity theft in Vikhe Patal program ) झालाय.

Stolen Power Supply
चोरीचा वीज पुरवठा

By

Published : Sep 26, 2022, 2:22 PM IST

नांदेड - नांदेडमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil ) यांचा सत्कार करण्यासाठी चक्क चोरी करून विजेचा वापर झाल्याचे उघड झाले आहे. हदगांव तालुक्यातील वाळकी बाजार येथे त्यांच्या नागरी सत्कारात हा चोरीचा प्रकार उघड ( Electricity theft in Vikhe Patal program ) झालाय.

चोरीचा वीज पुरवठा

विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने महसूलमंत्री पदी निवड झाल्याच्या निमित्ताने हा सत्कार आयोजित करण्यात आला होता. वाळकी गावातील शाळेच्या मैदानात हा सत्कार सोहळा घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी अत्यंत शिताफीने विजेची चोरी करण्यात आली होती. थेट महसूल मंत्र्यांच्या सत्कारासाठी चोरीच्या विजेचा वापर ( Use of stolen electricity to honor ministers ) झाल्याने या प्रकरणी आता काय कारवाई होते. त्याबाबत उत्सुकता निर्माण झालीय. तर दुसरीकडे आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी चोरीच्या विजेचा वापर झाल्याने आयोजक चांगलाच चर्चेत आलाय.

ABOUT THE AUTHOR

...view details