महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राणेंचे विधान महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही - बाळासाहेब थोरात - nanded latest news

कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री असला तरी तो राज्याचा मानबिंदू असतो. त्याचा सन्मान सर्वांनीच ठेवला पाहिजे, अशी प्रतिक्रिया मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी दिली.

बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात

By

Published : Aug 24, 2021, 5:32 PM IST

Updated : Aug 24, 2021, 5:42 PM IST

नांदेड - केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) हे वरिष्ठ व्यक्तिमत्त्व आहे. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्या तोंडातून असे विधान होणे ही भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. हे निषेधार्हच आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी नांदेड येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

'मुख्यमंत्री राज्याचा मानबिंदू'

नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर वाटले होते, की चार नवीन काम येतील. त्यांच्याकडून अशी अपेक्षा होती. पण तसे न होता उलट काही तरी वेगळेच होत आहे. कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री असला तरी तो राज्याचा मानबिंदू असतो. त्याचा सन्मान सर्वांनीच ठेवला पाहिजे, अशी प्रतिक्रिया मंत्री थोरात यांनी यावेळी दिली.

Last Updated : Aug 24, 2021, 5:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details