महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये डेल्टा प्लस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी सोमवारपासून निर्बंध - जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण समितीचे सदस्‍य यांच्यासमवेत नांदेड जिल्‍ह्यातील कोविड रुग्णांची स्थिती लक्षात घेवून सोमवार 28 जूनपासून सुरू करावयाच्‍या विविध सेवा, आस्‍थापना व त्‍यांच्‍या वेळा निश्चित करण्‍याबाबत निर्णय घेण्‍यात आला आहे.

डेल्टा प्लस
डेल्टा प्लस

By

Published : Jun 27, 2021, 8:40 PM IST

नांदेड - नांदेड जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण समितीचे सदस्‍य यांच्यासमवेत नांदेड जिल्‍ह्यातील कोविड रुग्णांची स्थिती लक्षात घेवून सोमवार 28 जूनपासून सुरू करावयाच्‍या विविध सेवा, आस्‍थापना व त्‍यांच्‍या वेळा निश्चित करण्‍याबाबत निर्णय घेण्‍यात आला आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश जारी केले आहेत.

डेल्टा प्लस विषाणूमुळे निर्बंध
राज्‍यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच कोरोनाच्‍या डेल्‍टा प्‍लस विषाणुने बाधीत रूग्‍ण आढळून येत आहेत. या विषाणुचा संक्रमणाचा दर जास्‍त असल्‍यामुळे विषाणुमधील बदल आणि त्‍यापासून होणारा प्रादुर्भाव व फैलाव रोखण्‍याच्या दृष्‍टीने राज्‍यातील सर्वच जिल्‍ह्यामध्‍ये स्‍तर-3 मधील तरतूदीनुसार सुरू करावयाच्‍या आस्‍थापनाबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना निर्देशीत केल्या आहेत.

सेवेचा तपशिल व निश्चित करण्यात आलेली वेळ -

  • अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू
  • अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना यांच्या वेळा सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत
  • मॉल्स, सिनेमा हॉल, नाटयगृह-पुर्णपणे बंद राहतील.
  • रेस्टॉरंट्स-सोमवार ते शुक्रवार 50 टक्के क्षमतेसह दुपारी 4 वाजेपर्यंत तर सायं. 4 वाजेनंतर पार्सल सेवा सुरू राहील.
  • शनिवार व रविवार फक्‍त पार्सल व होम डिलेव्हरी सुविधा चालू राहतील.
  • सार्वजनिक ठिकाणे / खुली मैदाने / फिरणे / सायकलींग- दररोज सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू असेल.
  • खासगी आस्थापना / कार्यालये- दुपारी 4 वाजेपर्यंत (सुट दिलेले कार्यालय / आस्‍थापना वगळून) कार्यालयीन उपस्थिती- शासकीय कार्यालये सहीत (सुट असलेली खासगी कार्यालये)- 50 टक्के उपस्थितीसह सुरू राहतील.
  • खेळ/क्रीडाप्रकार- सकाळी 5 ते सकाळी 9 पर्यंत सुरू राहतील.
  • सामाजिक, सांस्कृतिक आणि करमणुकीचे कार्यक्रम-सोमवार ते शुक्रवार 50 टक्के क्षमतेसह दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.
  • लग्नसमारंभाला 50 व्‍यक्‍तींची मर्यादा. अंत्‍यविधीसाठी 20 व्‍यक्‍तींची मर्यादा असेल.
  • बैठका / निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्था / सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा 50 टक्के क्षमतेसह परवानगी असेल.
  • शेतीशी निगडीत सर्वकामांमध्ये सातत्य राहावे याबाबत शेतीकामासाठी लागणाऱ्या सर्व अनुषंगिकसेवा, बी-बियाणे, खते, औजारे आणि त्यांची दुरूस्ती सेवा यांचा ही समावेश असेल.

नांदेड जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेड्स व्यापण्याच्या टक्केवारीमध्‍ये वाढ झाल्‍यास नव्‍याने प्रतिबंधात्‍मक आदेश निर्गमीत करण्‍यात येईल, असेही जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात नमूद केले.

हेही वाचा -फडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द - सचिन सावंत

ABOUT THE AUTHOR

...view details