महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये देशव्यापी संपाला उस्फूर्त प्रतिसाद, शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट - देशव्यापी संप नांदेड

कामगार आणि कर्मचारी संघटनांनी बुधवारी देशव्यापी संप पुकारला होता. या संपाला नांदेड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. संपादरम्यान सर्व शासकीय कार्यालये आणि बँका बंद होत्या.

bharat bandh agitation Nanded
नांदेडमध्ये देशव्यापी संपाला उस्फुर्त प्रतिसाद

By

Published : Jan 9, 2020, 9:03 AM IST

नांदेड - देशातील सर्व प्रमुख क्षेत्रातील कामगार, कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या देशव्यापी संपास नांदेड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये विविध विभागातील शासकीय कर्मचारी सहभागी झाल्याने जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय, खासगी उद्योग-धंदे, बँकांमध्ये बुधवारी सकाळपासूनच शुकशुकाट दिसून येत होता.

नांदेडमध्ये देशव्यापी संपाला उस्फूर्त प्रतिसाद

आयटक, सिटू, इंटक, हिंद मजदूर सभा आदी देशपातळीवरील प्रमुख कामगार संघटनांसह शासकीय कर्मचारी, महसूल, बँक, पोस्ट, एलआयसी, टेलीफोन, आरोग्य, वनीकरण, एस. टी. महामंडळ, ग्राम पंचायत, विडी कामगार, रोजगार सेवक, ग्राम पंचायत कर्मचारी आदी विविध क्षेत्रातील कामगार कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी कामगारांना कायम करावे, खासगीकरण बंद करावे, कंत्राटी कामगारांना कामगार कायद्याचे संरक्षण मिळावे. विडी कामगारांसाठी घरकुल योजना अंमलात आणावी, शासकीय कार्यालयातील रिक्त पदे त्वरित भरावीत या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी कामगार, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर, खासगी, केंद्रीय कर्मचारी, पोस्ट, एलआयसी, रेल्वे आदी क्षेत्रातील संघटित, असंघटित कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी बुधवारी देशव्यापी संप पुकारला होता.

संपाला नांदेड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी नांदेड जिल्हा कामगार, कर्मचारी संयुक्त कृती समितीच्यावतीने महात्मा फुले पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शासकीय, निमशासकीय, खासगी क्षेत्रातील कर्मचारी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, ग्राम पंचायत कर्मचारी, सरकारी कर्मचारी, महसूल कर्मचारी, विडी कामगार, आशा वर्कस, वनमजूर, पोस्ट, टेलीफोन, एल आय सी, एसटी महामंडळ, सफाई कामगार आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुपारी १२ वाजता महात्मा फुले पुतळ्यापासून निघालेला मोर्चा २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. याठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी मोर्चातील घोषणांमुळे अवघे नांदेड शहर सुमारे तीन तास दुमदुमले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details