नांदेड - एका खुनाच्या गुन्ह्याच्या तपासाबाबत असंतुष्ट असलेल्या तक्रादाराने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचे पडसाद पोलीस अधीक्षक कार्यालयात उमटले. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर हा प्रकार घडल्याने कार्यालयाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी राखीव पोलीस दलाचे निरीक्षक पोफळे यांना निलंबित केले आहे.
राखीव पोलीस दलाचे निरीक्षक निलंबित; नांदेड पोलीस अधीक्षकाची कारवाई
एका तक्रारदाराने नांदेडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. याप्रकरणी राखीव पोलीस दलाचे निरीक्षक पोफळे यांना निलंबित करण्यात आले आहे.
एका तक्रारदाराने 17 जूनला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला. या तक्रारदाराच्या मुलाचा काही दिवसांपूर्वी खून झाला होता. या घटनेमुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या सुरक्षा रक्षकांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक कार्यालयात कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये आजारी कर्मचाऱ्यांना तैनात करण्याची आल्याची गंभीर बाब समोर आली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक पोफळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.