महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस निरीक्षकांच्या बदल्या नियमबाह्य, महासंचालकांकडे तक्रार - पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल

नांदेड पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्या नियबाह्य असल्याची तक्रार पोलीस महासंचालकांकडे करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड
पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड

By

Published : Jan 28, 2020, 3:20 PM IST

नांदेड- मागील महिन्यात जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. या बदल्या नियमबाह्य झाल्याची चर्चा वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू होती. याबाबात बुधवारी (दि. 22 जानेवारी) सामाजिक कार्यकर्ते व रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बदल्यासंबंधी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांच्याकडे तक्रार केली.

पोलिसांच्या बदल्यांबाबत महासंचालकांकडे तक्रार


या तक्रारीत 14 जानेवारी, 2009चे परिपत्रक, तसेच विशेष पोलीस महानिरीक्षकांचे बदल्यांबाबतचे पत्रक जोडण्यात आले असून ही बदली नियबाह्य असल्याचे तक्रारी म्हटले आहे. या तक्रार अर्जात स्थानिक गुन्हे शाखेसह इतर पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांबाबत तक्रार करण्यात आली आहे.

हेही वाचा - रेणुकादेवी संस्थान कर्मचाऱ्यांचा बैठा सत्याग्रह, सेवेत कायम करण्याची मागणी

वरिष्ठांकडून कोणता पवित्र घेतला जातो? याकडे पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष आहे. या तक्रारीबाबत पोलीस अधीक्षकांना विचारले असता पोलीस निरीक्षकांच्या बदल्या या आस्थापना मंडळाचा निर्णय असून याबाबत सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - 'प्रतापराव तुम्ही दिल्लीत पोहोचलात, आता दिल्लीही जिंकाल'

ABOUT THE AUTHOR

...view details