नांदेड - राज्यराणी एक्स्प्रेस ३ डिसेंबरपासून, तर देवगिरी एक्स्प्रेस ५ डिसेंबरपासून प्रवाशांचा सेवेखातर सुरू होणार आहे. प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर, तसेच या गाड्यांमध्ये प्रवास करताना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड - १९ संसर्गासंदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल, अशी माहिती मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या वतीने कळवण्यात आली आहे.
रेल्वे गाड्यांची माहिती पुढील प्रमाणे
१. गाडी संख्या ०७६११ नांदेड-मुंबई राज्यराणी विशेष गाडी ३ डिसेंबर २०२० रोजी हुजूर साहीब नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री १० वाजता परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड मार्गे मुंबई सीएसटी येथे सकाळी १०.०७ वाजता पोहोचेल.
२. गाडी संख्या ०७६१२ मुंबई-नांदेड राज्यराणी विशेष गाडी ४ डिसेंबर २०२० रोजी मुंबई सीएसटी रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ०६.४५ वाजता सुटून मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी मार्गे हुजूर साहीब नांदेड येथे सकाळी ०७.२० वाजता पोहोचेल. या गाडीला १७ डब्बे असतील.
३. गाडी संख्या ०७०५८ सिकंदराबाद-नांदेड-मुंबई-देवगिरी विशेष गाडी ५ डिसेंबर २०२० रोजी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून दुपारी ०१.२५ वाजता सुटून नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड मार्गे मुंबई सीएसटी येथे सकाळी ०७.१० वाजता पोहोचेल.
४. गाडी संख्या ०७०५७ मुंबई-नांदेड-सिकंदराबाद देवगिरी विशेष गाडी ६ डिसेंबर २०२० रोजी सीएसटी मुंबई रेल्वे स्थानकावरून रात्री ०९.३० वाजता सुटून औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड मार्गे सिकंदराबाद येथे दुपारी ०२.४० वाजता पोहोचेल. या गाडीला २१ डब्बे असतील.
हेही वाचा -नांदेड जिल्ह्यात 28 कोरोनाबाधितांची भर; 23 रुग्णांना सुट्टी