नांदेड - दिवंगत राजीव सातव यांच्या अस्थिकलशाची कळमनुरी ते नांदेड अशी यात्रा काढण्यात आली. या अस्थिकलशाचे कळमनुरी ते नांदेड दरम्यान जागोजागी दर्शन घेण्यात आले. या भागातील उमद्या नेत्यांचे अचानकपणे जाणे सर्वांसाठी धक्कादायक आहे. त्यामुळे, आज सातव यांच्या चाहत्यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेत आपल्या नेत्याला निरोप दिला.
अस्थी कलश यात्रा
सातव यांची अस्थी कलश यात्रा आज सकाळी नऊ वाजता कळमनुरी येथे त्यांच्या निवासस्थानातून निघाली. कळमनुरी, आखाडा बाळापूर, वारंगा फाटा, डोंगरकडा, पार्डी म., अर्धापूर नांदेड या मार्गाने नांदेड येथील गोदावरी नदी (विष्णुपुरी) येथे अस्थी विसर्जन होणार आहे. सदर रस्त्यावरिल सर्व ठिकाणी अस्थी कलशाचे दर्शन घेण्यात आले.