महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra Special Report: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज पोहोचणार महाराष्ट्रात, विरोधकांची काँग्रेसवर सडकून टीका - Bharat Jodo Yatra in Maharashtra

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा सोमवारी नांदेड जिल्ह्यात प्रवेश करीत आहे. महाराष्ट्रात सर्वात प्रथम ही यात्रा देगलूर मार्गे प्रवेश करीत आहे. राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा भाजपसमोर आव्हान निर्माण करण्यात आणि काँग्रेस पक्षाला सत्तेचा सोपान चढण्यास किती लाभदायक ठरते याकडे सर्वांचे लक्ष लागले ( BJP leaders criticize Bharat Jodo Yatra ) आहे.

Bharat Jodo Yatra Special Report
राहूल गांधी

By

Published : Nov 7, 2022, 7:26 AM IST

नांदेड :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा सोमवारी नांदेड जिल्ह्यात प्रवेश करीत आहे. महाराष्ट्रात सर्वात प्रथम ही यात्रा देगलूर मार्गे प्रवेश करीत आहे. दक्षिण भारतात या यात्रेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे उत्साहित झालेल्या महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी या यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. देशाच्या इतिहासावर नजर टाकली तर अशा यात्रा समाजावर व राजकारणावर परिणाम करतात हे यापूर्वी दिसून आले. त्यामुळे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा भाजपसमोर आव्हान निर्माण करण्यात आणि काँग्रेस पक्षाला सत्तेचा सोपान चढण्यास किती लाभदायक ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले ( BJP leaders criticize Bharat Jodo Yatra ) आहे.

अडवाणींची रथयात्रा देशभर : स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेने बलाढ्य इंग्रजी सत्तेचा पाया खिळखिळा केला. महात्माजींचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीसाठी पदयात्रा काढून भूमिहिनासाठी हजारो एकर शेतजमीन गोळा केली. चित्रपट अभिनेते आणि काँग्रेसचेच नेते सुनिल दत्त यांच्या यात्रेनेही धगधगत्या पंजाबात सकारात्मक वातावरण निर्मिती केली. प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा लाँगमार्चही एक प्रकारे पदयात्राच होती. त्यांच्या यात्रेने विद्यापीठ नामांतराच्या चळवळीला मोठी गती दिली. आज केंद्रात मजबूत सरकार स्थापन केलेल्या भाजपचा बोलबालाही अडवाणींच्या रथयात्रेनेच देशभर ( Advani Rath Yatra across country ) झाला. हा सर्व इतिहास पाहता देशपातळीवर निघणाऱ्या पदयात्रा समाजात आणि राजकारणात जागृती निर्माण करतात हे दिसून येते. त्या धर्तीवर राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे मूल्यमापन करणे अत्यावश्यक आहे. २०१४ मध्ये देशात जी मोदी लाट आली त्यामुळे शतकाची परंपरा असलेला काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला. त्यानंतर झालेल्या अनेक निवडणुकात काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे गेल्या आठदहा वर्षात काँग्रेस कार्यकर्त्यात एक प्रकारची मरगळ आली.

भाजप नेत्याची काँग्रेसवर टीका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पक्ष सोडून भाजपकडे : निवडणुकातील पराभवामुळ काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते पक्ष सोडून भाजपकडे ( Senior Congress leaders leave party ) गेले. त्यामुळेही काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला. भाजपच्या केंद्रातील मजबूत सत्तेपुढे आपला आता काहीही टिकाव लागणार नाही या कल्पनेने नेते संभ्रमित झाले तर कार्यकर्त्यात मरगळ आली. केंद्रात सत्ता नसताना, देशातील अनेक राज्यात सत्ता नसताना काँग्रेसमधील मरगळ दूर करणे गरजेचे होते. सर्वत्र प्रतिकूल वातावरण असताना आणि गेली आठ-दहा वर्षे चोहोबाजुंनी स्वत:वर टिकेची झोड उठली असताना राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत. या यात्रेचा उद्देश केंद्रातील मोदी सरकारसमोर काँग्रेसचे तगडे आव्हान उभे करणे हाच आहे. तो कितपत साध्य होतो यावर या यात्रेचे यशापयश अवलंबून आहे.

केंद्रात भाजपचे मजबूत सरकार :आजमितीला केंद्रात भााजपचे मजबूत सरकार ( BJP strong government ) आहे. ३०० पेक्षा जास्त खासदार भाजपाचे आहेत. कोणत्याही कारणाने केंद्रातील सत्ता धोक्यात येईल याची कोणतीही चिन्हे आज तरी दिसत नाहीत. हे खरे असले तरी केंद्रातील मजबूत असलेल्या भाजप सरकार समोर खरे आव्हान उभे करण्याची ताकद देशात फक्त काँग्रेस पक्षातच आहे. इतर कोणताही राजकीय पक्ष भाजप समोर आव्हान उभे करु शकत नाही. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेची शक्ती कितीही दिसत असली आणि या पक्षाचे नेते रोज जरी भाजपावर टिका करीत असले तरी केंद्रातील मोदी सरकारसमोर मोठे आव्हान उभे करण्याची ताकद या दोन्ही पक्षाकडे नाही. या दो्न्ही पक्षाच्या प्रादेशिक मर्यादा आहेत.

काँग्रेस हा जुना पक्ष :काँग्रेस हा शंभराहून अधिक वर्षे जूना पक्ष ( Congressold party) आहे. देशातील प्रत्येक गावात किमान ४-५ तरी काँग्रेसला मानणारे लोक आहेत. काँग्रेस विचारधारा जोपासणारे नेते आज सत्ता नसल्याने अडगळीला पडले असले तरी त्यांनी काँग्रेसची विचारधारा जीवंत ठेवली आहे. देशपातळीवर सर्व जाती धर्माना सोबत घेऊन चालणारा पक्ष अशी प्रतिमा काँग्रेसने मागच्या काळात निर्माण केली, त्यावर अजूनही लोकांचा विश्वास आहे. या बळावर काँग्रेसचे संघटन पुन्हा बळकट करण्याची जबाबदारी काँग्रेस नेत्यावर आहे. ते काम आता राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने हाती घेतले आहे. या यात्रेमुळे मरगळ आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण होईल. काँग्रेस नेते कामाला लागतील. संघटनेला बळ येईल. त्यातून हा पक्ष नव्याने उभारी घेऊ शकेल. लोकशाहीत निवडणुका आणि संख्याबळाला महत्व असते. जय पराजय होतच असतात. आज केंद्रात मजबूत सरकार बनविणाऱ्या आणि संपूर्ण जगभर दबदबा निर्माण करणाऱ्या भाजपचे यापूर्वी केवळ दोन खासदार संसदेत होते. परंतु भाजपाच्या कार्यकर्त्यांनी चिकाटीने परिश्रम करुन केंद्रात आणि अनेक राज्यात भाजपला सत्तेत आणले.

काँग्रेस कार्यकर्त्यात चैतन्य निर्माण करण्याची गरज :तसे चैतन्य काँग्रेस कार्यकर्त्यात निर्माण करण्याची गरज ( Need awareness among Congress workers ) आहे. काँग्रेसवर गांधी-नेहरु घराण्याचे गारुड आहे. आज त्याच घराण्याचा वारस दररोज कार्यकर्त्यात आणि लोकात मिसळून पायी वाट चालतो. त्याचा परिणाम कार्यकर्त्यावर निश्चित होणार आहे. भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस नेत्यात आणि कार्यकर्त्यात निर्माण झालेले चैतन्य दोन वर्षे टिकले तर आगामी सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला चांगली प्रतिष्ठा मिळेल ही शक्यत नाकारता येत नाही. परंतू केवळ भारत जोडो यात्रेमुळे आलेले चैतन्य या बळावर दिल्लीच्या तख्ताला टक्कर दिली जाईल हे समजणेही चुकीचे होईल. याचे कारण काँग्रेसचा पराभव का झाला याचाही विचार काँग्रेस नेत्यांना करावा लागेल. दिल्लीत अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे देशात भ्रष्टाचार हा कळीचा मुद्दा झाला. सर्वसामान्य नागरिकात भ्रष्टाचाराबाबत अत्यंत चिड होती आणि आजही आहे. अण्णांच्या आंदोलनाने जनसामान्यातील संतापाला वाट मोकळी करुन दिली. तोच भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन भाजपने २०१४ ची निवडणूक लढविली. त्या काळात झालेले अनेक घोटाळे आणि त्या घोटाळ्याची सर्वत्र झालेली चर्चा पाहून सामान्य नागरिकांनी भाजपला सत्तेवर बसविले. त्यामुळे यापुढे काँग्रेस भ्रष्टाचाराला पाठिशी घालणार नाही, भ्रष्टाचार मुक्त सरकार लोकांना देईल याचा विश्वास राहूल गांधींनी लोकांना देणे गरजेचे आहे.

संघटन चालविण्यासाठी निधी : पक्ष, संघटन चालविण्यासाठी निधी आवश्यक असतो. यापूर्वीही काँग्रेस निधी उभारुनच पक्ष व संघटना चालवित होती. परंतू त्यावेळी लोककल्याणासाठी होणाऱ्या कामाच्या निधीवर डल्ला मारला जात नसे. त्यामुळे रस्ते, धरण, शासकीय इमारती, पूल यांची कामे टिकाऊ व गुणवत्तापूर्वक असत. शासकीय कामाची ती गुणवत्ता आता कोठेही राहिली नाही. त्याची कारणे सर्वानाच माहिती आहेत. रस्ते, वीज, पिण्याचे शुद्ध पाणी आणि सिंचनाच्या सुविधा यांची कामे दर्जेदारच झाली पाहिजेत. या कामात कोणताही भ्रष्टाचार होता कामा नये. सरकारचा कारभार पारदर्शक असेल अशी ग्वाही सर्वसामान्यांना या यात्रेच्या निमित्ताने दिली गेली पाहिजे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे जे कार्यकर्ते खरोखरच प्रामाणिक आहेत, ज्यांची पक्षनिष्ठा वादातीत आहे अशा कार्यकर्त्याची पक्ष संघटनेत कदर झाली पाहिजेत. काँग्रेसचे गावागावात असे हजारो कार्यकर्ते आहेत ज्यांचे पूर्ण आयूष्य संघटनेचे काम करताना सतरंज्या टाकण्यात आणि उचलण्यात गेले. त्यांना कधीही सत्तेत मानाची स्थानं मिळाली नाहीत. कार्यकर्त्यांची अशी गोची होत असेल तर कार्यकर्ते पाट्या टाकण्याचे काम करतात व त्याचा परिणाम संघटना कमकूवत होण्यावर होतो. संघटनेत गटातटाचे राजकारण होणार नाही याचीही खबरदारी पक्षनेतृत्वाला घ्यावी लागेल. सर्वात महत्वाचे म्हणजे नरेंद्र मोदीसारखे तगडे नेतृत्व भाजपकडे आहे.

मुकाबला करण्यासाठी रणनीती : एकहाती सत्ता मिळविण्याची ताकद भाजपकडे ( Congress Need Strategy ) आहेत. त्यांचा मुकाबला करण्यासाठी नेमकी काय स्ट्रँटेजी आखायची याचा सारासार विचार काँग्रेसला करावा लागेल. राजकीय दृष्टीकोणातून मोदीवर आरोप काहीही करता येतील परंतु त्यांना निवडणुकीत पराभूत करणे सोपी गोष्ट नाही हे लक्षात घेतले पाहिजेत.मात्र भारतीय जनता पार्टीने सुद्धा भारत जोडो वर टिक्का करताना माघे राहिला नाही मंत्री खासदार आमदार सुद्धा भारत जोडो वर टिक्का करताना दिसत आहे. भारत जोडो हि यात्रा भाजपाला मदत करत असल्याच वक्तव्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. गिरीश महाजन यांनी देशात काही परिवर्तन होणार नाही, देशात काँग्रेस आणि गांधी घरांची क्रेझ राहिली नाही आणि राहुल गांधी हे आता सुद्धा अध्यक्ष राहिले नाही अशी टिक्का देखील केली. राज्यात काँग्रेसचा एक खासदार आणि देशात 42 खासदार असलेला काँग्रेस पक्ष. जिथे काँग्रेस नाही तिथे काँग्रेसने यात्रा काढायची असा सल्ला खासदार चिखलीकर यांनी दिला. मात्र आता भारत जोडो यात्रा देशात परिवर्तन करेल का हे मात्र येणाऱ्या निवडणुकीत कळेल.

ABOUT THE AUTHOR

...view details