महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी दिली गुरुद्वाराला भेट; गुरुपोर्णिमेच्या दिल्या शुभेच्छा - गुरुपूरानिमित्त शुभेच्छा दिल्या

राहुल गांधी यांनी देगलूर येथील संस्मरणीय बाबा जोरावर सिंग बाबा फतेह सिंगजी यांच्या गुरुद्वारात भेट ( Rahul Gandhi visits Gurdwara ) दिली. श्री गुरुनानक देवजी यांच्या आशीर्वादाने परस्पर सौहार्द आणि समानतेसाठी राहुल गांधी यांनी प्रार्थना केली.

Rahul Gandhi
राहुल गांधी यांनी दिली गुरुद्वाराला भेट

By

Published : Nov 8, 2022, 7:00 AM IST

Updated : Nov 8, 2022, 4:26 PM IST

नांदेड : भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra ) राहुल गांधी ७ ते ११ नोव्हेंबरदरम्यान नांदेड जिल्ह्यात असणार आहे. जिल्ह्यात राहुल गांधींचे चार मुक्काम असणार आहेत. राहुल गांधी यांनी देगलूर येथील संस्मरणीय बाबा जोरावर सिंग बाबा फतेह सिंगजी यांच्या गुरुद्वारात भेट ( Rahul Gandhi visits Gurdwara ) दिली. श्री गुरुनानक देवजी यांच्या आशीर्वादाने परस्पर सौहार्द आणि समानतेसाठी राहुल गांधी यांनी प्रार्थना केली आणि गुरुपूरानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

गुरुद्वारापासून यात्रेला होणार सुरुवात :राहुल गांधींची यात्रा रात्री महाराष्ट्रात देगलूर येथे दाखल झाली. सकाळी 8.30 वाजता- नांदेडमधील गुरुद्वारापासून यात्रेला सुरुवात होणार आहे. सकाळी 9.30 वाजता- अटकाळी गावाजवळ विश्रांती घेणार आहेत. दुपारी 4 वाजता- पदयात्रेला खतगाव फाट्यापासून सुरुवात होईल. संध्याकाळी 7 वाजता- संध्याकाळची विश्रांती घेण्यात येणार आहे.

देशाला जोडणे हा यात्रेचा उद्देश : भारत जोडो यात्राला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. यात्रा फक्त श्रीनगर, जम्मू-काश्मीरमध्ये थांबेल आणि आम्ही तिथे तिरंगा फडकावू. देशाला जोडणे हा यात्रेचा उद्देश आहे असे काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटले आहे. भारत जोडो यात्रा नांदेड (bharat jodo yatra in maharashtra) मध्ये दाखल झाल्यावर ते तेथे बोलत होते.

महाराष्ट्रात असे असेल भारत जोडो यात्रेचे नियोजन :भारत जोडो यात्रेचा 3500 किमीचा प्रवास हा काँग्रेस पक्षासाठी आणि संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक घटना आहे. ही भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रमध्ये येत आहे. सात ते 11 नोव्हेंबर दरम्यान ती नांदेड जिल्ह्यात, 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान हिंगोली जिल्ह्यात, 15 ते 16 नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यात, 16 ते 18 नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यात आणि 18 ते 20 रोजी रोजी बुलढाणा जिल्ह्यात मार्गाक्रमण करणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी वाशीम शहरातील अजनखेड, बोराला फाटा येथे १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सहभागी होणार होणार आहे.

Last Updated : Nov 8, 2022, 4:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details